भडगाव तालुक्यातील कनाशी येथे विहिरीत आढळले आईसह दोन लेकरांचे मृतदेह.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०२/२०२१
भडगाव तालुक्यातील कनाशी येथील शेतात एका महिलेसह तिचा मुलगा व मुलगी यांचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गायत्री दिनेश पाटील (वय ४३) या मुलगा खुशवंत दिनेश पाटील (वय १०) आणि मुलगी भैरवी पाटील (वय ८) हे तिघे कनाशी शिवारातील आपल्या शेतात कामानिमित्त गेले होते. परंतु सायंकाळी ते घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचे मृतदेह विहिरीत आढळून आले.
याप्रकरणी पोलिस पाटील अनिल पाटील यांनी दिलेल्या भडगाव पोलीस स्टेशनला खबर दिली या प्रकरणी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक श्री.अशोकजी उत्तेकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. आनंद पटारे भडगाव पोलीस स्टेशन यांनी भेट देऊन परिस्थीतीची पहाणी केली व योग्य सुचना दिल्या असून पुढील तपास सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे करीत असून हा प्रकार नेमका घातपात की अपघात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.