पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई. सविस्तर वृत्त उद्या

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०२/२०२१
कोरणाचा वाढता पादूर्भाव पाहता जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या मागर्दशक सूचना व नियमाचे पालन न करणाऱ्यावर कठोर कारवाई तसेच आस्थापना ही सील करण्यात येतील असे आदेश दिल्याने याची दखल घेत
जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच पाचोरा डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निताजी कायटे यांनी त्यांच्या हद्दीतील गावपरिसरातील गावागावात जातीने लक्ष देऊन नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती विरोधात धडक मोहीम राबवून वरखेडी, भोकरी, लोहारी, वाडी शकतो वाळे व इतर काही ठीकाणी जवळपास १८ ते २० बिना मास्क आढळून आलेले प्रवासी व वाहनचालक यांना प्रत्येकी २०० रुपये दंडात्मक कारवाई तर काहींना पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनला येण्याची समज दिल या मोहीमेत पोलिस कर्मचारी रंजीत पाटील , अरुण राजपूत , संदीप राजपूत , दिपकसींग पाटील , पोलीस पाटील दगडु गोसावी, विजय कुमार जोशी , तलाठी संदीप चव्हाण , कोतवाल अशोक धनगर , आणि ग्रामपंचायत कर्मचारी शेनपडू बोरसे , सागर चौधरी या कारवाईत सामील होते.
या कारवाईच्या धास्तीने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील गावपरिसरातील जनतेने कारवाईचा धसका घेत ठरलेले लग्न सोहळे व इतर कार्यक्रम करतांना नियमाची पायमल्ली होणार नाही अश्या उपाययोजना करत कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे.
या कारवाई बाबत जनतेतून पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.