स्वर्गीय बापुसो उदयजी वाघ यांची पाचोरा भाजप तर्फे स्मृती सभा संपन्न
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/११/२०२)
आज दिनांक २८ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय पाचोरा येथे भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर व ग्रामीण च्या वतीने स्वर्गीय बापुसो उदय जी वाघ यांच्या प्रतिमेचे पूजन करून व त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन आदरांजली वाहण्यात आली
सर्वप्रथम तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे व शहराध्यक्ष रमेश वाणी तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले
तदनंतर ज्येष्ठ मार्गदर्शक सदाशिव आबा व जि प सदस्य मधुभाऊ काटे यांनी स्वर्गीय बापूसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी दोघेही वक्त्यांनी स्वर्गीय बापू साहेबांचा संघर्षमय जीवनपटच सर्वांसमोर उलगडून ठेवला. असे नेतृत्व पुन्हा होणे नाही हा एकच सूर सर्व कार्यकर्त्यांच्या मुखातून निघत होता सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सरचिटणीस गोविंद भाऊ शेलार यांनी केले
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती माजी सभापती बन्सीलाल पाटील प.स. गटनेते सुभाष भाऊ पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर भाऊ संचेती रवी भाऊ पाटील सुधीर भाऊ पुणेकर तालुका उपाध्यक्ष प्रमोद सोमवंशी शरद पाटील भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील उपतालुका अध्यक्ष नीतू नाना शहर सरचिटणीस दीपक माने उपशहर अध्यक्ष नितीन पाटील भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे शहर सरचिटणीस कुमार खेडकर उपशहर अध्यक्ष वीरेंद्र पाटील महिला आघाडी तालुकाध्यक्ष रेखा ताई पाटील शहराध्यक्ष ज्योतीताई भामरे तसेच निलेश पाटील माजी शहराध्यक्ष नंदू सोमवंशी युवा मोर्चाचे राहुल गायकवाड अमोल नाथ व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.