भाजपा जिल्हा कार्यकारणीत पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाला विशेष संधी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०२/२०२१
भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष पद घेतल्यानंतर अमोल शिंदे यांनी मतदार संघात आपला जनसंपर्क वाढवला असुन पक्ष संघटना वाढवुन गावा गावांत व शहरांतील प्रत्येक वार्डात संघटन मजबुत करण्यावर भर दिला असून भारतीय जनता पार्टी ने याची दखल घेत जिल्हा कार्यकारणीत जि. प.सदस्य मधुकर काटे यांना जिल्हा सरचिटणीस व भडगाव चे मा.तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांना जिल्हा चिटणीस पदी नियुक्त करून पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाला विशेष संधी देऊन येणाऱ्या काळात पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचाच आमदार बनावा यासाठी संघटन मजबुत करण्यास सुरुवात केली आहे.त्यासोबतच हिम्मतसिंग नाना पाटील यांची पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी तर गोविंद दगा पाटील यांची इतर मागासवर्गीय आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच नितीन तायडे यांची चर्मकार संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याने सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘अटल’भारतीय जनता पार्टी पाचोरा येथे पार पडला याप्रसंगी भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील,शहराध्यक्ष रमेश वाणी,सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील,याप्रसंगी बाजार समितीचे मा.सभापती सतिष शिंदे, पं.स.सभापती वसंत गायकवाड, मा.सभापती सुभाष पाटील, डी.एम.पाटील,बाजार समिती संचालक व शिंदाडचे उप सरपंच नरेंद्र पाटील,प्रमोद सोमवंशी,किरण पांडे,शहर सरचिटणीस दिपक माने,भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील,शहराध्यक्ष समाधान मुळे, कांतीलाल जैन,प्रदीप पाटील,जगदीश पाटील,सुधीर पुणेकर,सुनील पाटील,विजू राठोड,विरेंद्र चौधरी,भैय्या ठाकूर,कुमार खेडकर,विजय पाटील,अनिल शिंदे,योगेश पाटील,भुषण पाटील,शशिकांत पाटील, उस्मान मामु,एकनाथ अप्पा महाजन,रवि पाटील,बाळू धुमाळ,स्वप्नील (बंटी)पाटील, रोहिदास मांडोळे,योगेश माळी व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.