पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली विकासकामांची शपथ राज्यातील पहिला आगळावेगळा उपक्रम.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे भाजप ने निर्विवाद बहुमत मिळविले असून ह्या गावचे सरपंचपद अनु जाती चे राखीव झाले यामुळे भाजपचे सिद्धेश्वर पॅनलचे ज्ञानेश्वर तांबे सरपंच तर भाजपचे नरेन्द्र पाटील उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आले १५ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीने राज्यात आगळा वेगळा उपक्रमाने सुरुवात केली यात राज्यघटनेने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन म्हणून ह्या मिनी मंत्रालयाचे सरपंच उपसरपंच सदस्यांनी आज भ्रष्टाचारमुक्त व विकासाची बांधिलकी ची शपथ ग्रामविकास अधिकारी नरेंद्र शिंदाड ग्रामपंचायत सरपंचपदी ज्ञानेश्वर तांबे तर उपसरपंच नरेंद्र पाटील बिनविरोध
शिंदाड ग्रामपंचायत सरपंचपदी ज्ञानेश्वर तांबे तर उपसरपंच नरेंद्र पाटील बिनविरोध
शिंदाड ता पाचोरा- येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर महादू तांबे तर उपसरपंचपदी नरेंद्र विक्रम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिंदाड ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद हे अनुसूचित जाती साठी राखीव असल्याने अनुसूचित जाती चे एकमेव सदस्य ज्ञानेश्वर तांबे असल्याने सरपंच पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आलेला होता. तसेच उपसरपंच पदी नरेंद्र पाटील यांचाही एकच अर्ज दाखल झाला होता. यामुळे त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संदीप सराफ, स्वप्नील पाटील, जनाबाई पाटील, बिस्मिल्ला तडवी, विलास पाटील, ठगुबाई धनगर ,कांताबाई पाटील, उज्वला बाई पाटील, मिराबाई परदेशी ,नजमा बाई तडवी, लाल बी तडवी ,कांचन परदेशी ,आदी सदस्य उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्यांनी शपथविधीचा आगळावेगळा कार्यक्रम घेऊन पद्ग्रहण सोहळा सम्पन्न झाला ग्रामविकास अधिकारी नरेंद्र मराठे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली . निवडणूक निर्णय अधिकारी आर एस धस सहायक निवडणूक अधिकारी ग्राम अधिकारी नरेंद्र मराठे यांनी कामकाज पाहिले ग्रामपंचायत लिपिक प्रल्हाद शिंपी संजय पाटील रवींद्र पाटील अमोल पाटील यांनी परिश्रम घेतले. यांनी शपथ दिली.