ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही, आमदार किशोर आप्पा पाटलांचे वर्चस्व कायम.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/११/२०२३
पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी आमदार झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची विरोधाची भुमिका मनात न ठेवता पक्षातील कार्यकर्ते असोत वा विरोधातील लोक असतो सगळ्यांना सोबत घेऊन पाचोरा व भडगाव तालुक्यातील गाव, खेड्यापाड्यातील वाडावस्तींवर विकासाची गंगा आणून सगळीकडे विकासकामे केली आहेत.
याच्याच माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असलेले आमदार म्हणून किशोर आप्पा पाटील यांनी जनमानसात आदराचे स्थान मिळविले असल्याने व किशोर आप्पा पाटीलच विकासाची गंगा आणून तालुक्यातील गावागावातून सुविधा उपलब्ध करुन देऊ शकतात तसेच शेतकऱ्यांचा हितासाठी सतत झटत असल्याने विकासात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवत पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व भडगाव शेतकी संघात निवडून दिले आहे.
तसेच आता नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या असून या निवडणूकही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आज नुकताच ग्रामपंचायतीचा निवडणुक निकाल जाहीर झाला असून यात एकूण १० ग्रामपंचायतीपैकी ०८ ग्रामपंचायतीवर किशोर आप्पा पाटील यांनी आपले वर्चस्व कायम ठेवत
आपल्या नेतृत्वाखाली कनाशी, शिंदी, गोंडगाव, अंजनविहीरे, गाळण, वडगाव आंबे, विष्णू नगर तांडा, चिंचपुरे या गावातील सरपंच व सदस्य निवडणुकीत विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध करुन दाखवले आहे. तसेच वडगाव आंबे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या कार्यकर्त्यांनसोबत युती करुन माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या कार्यकर्त्यांनी सुध्दा भरघोस मते मिळवून विजय प्राप्त केला आहे.