शहरात तनावाचे वातावरणात निर्माण करणाऱ्या मनोरुग्णाला माणूसकी समूह व बेगमपुरा पोलिसांनी उपचारासाठी मनोरुग्णालयात केले दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०२/२०२२
औरंगाबाद शहरात नेहमी तनावाचे वातावरण निर्माण करनाऱ्या मनोरुग्णास बेगमपुरा पोलीसांच्या मदतीने माणुसकी समुहाने दिव्य सेवा प्रकल्प मनोरुग्णालयात आशोक काकडे बुलढाणा येथे उपचारासाठी दाखल केले.
पोलीस ठाणे बेगमपुरा औरंगाबाद शहरात नव्याने रुजू झालेले पोलीस निरिक्षक प्रशांत पोतदार साहेब, पोलीस ठाणे बेगमपुरा हद्दीतील घाटी ते टाऊन हॉल परिसर येथे नेहमी एक व्यक्ती वेडसर मनोरुग्ण अवस्थेत फिरत असल्याने परिसरातील रहिवासी यांनी ११२ द्वारे आम्हास कळविले होते. माणुसकी समूहाचे सुमित पंडित यांनी स्वतः त्या रुग्णास भडकल गेट, टाऊन हॉल या परिसरात या मनोरुग्णाला बघितले आहे.
रात्रभर रोडवर फिरणे, अंगावरचे कपडे न ठेवणे, रात्री-अपरात्री रोडवर वाहतुक अडवणे, लोकांना अडविणे तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करणेअश्लील वर्तन करने, येनाऱ्या जानाऱ्या महिलांना त्रास देणे. आज दि ०६-०२-२२रोजी भटकल गेट जवळ तो दगडफेक करीत होता. त्यामुळे शहरात तनावाची परीस्थिती नाकारता येत नव्हती. तसेच या परिसरातील नागरिक त्रस्त होत आहे.या आधी हि एका माथेफिरू ने दिनांक २६-१०-२०२१ रोजी भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे लावन्यात आलेल्या THANK YOU DR AMBEDKAR या डिजिटल फ्लेक्स बोर्ड ला दगड मारून सदर बोर्डाचे नुकसान केले होते.
तेव्हा त्या घटनेवर परिसरात जातीय तणाव निर्माण झाला होता.हिच खबरदारी घेवुन त्यास तात्काळ ताब्यात घेतले व सदर मनोरुग्णासाठि काम करणाऱ्या सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांना सदर मनोरुग्ण पेशंट ची माहिती फोनद्वारे पी. आय. प्रशांत पोतदार यांनी दिली. त्यावेळी आमच्या विनंतीनुसार समाजसेवक सुमित पंडित यांनी मनोरुग्णाची पाहणी करून त्यास घाटी रुग्णालयामध्ये प्रथम भरती करून त्यास डॉक्टरांनी मनोरुग्ण असल्याचे सांगितले असता सदरील मनोरुग्ण व्यक्तीस अन्न ,वस्त्र,निवारा औषधोपचारा साठी राहण्याची कुठे व्यवस्था करता येईल का? त्या करिता सुमित पंडित यांनी दिव्य सेवा प्रकल्प शोक काकडे, बुलढाणा येथे संपर्क साधुन सदरील मनोरुग्णाची माहिती दिली असता त्यांनी त्या मनोरुग्ण सांभाळण्यासाठी होकार दिला व खाजगी वाहनाने त्या मनोरुग्णाला दिव्य सेवा प्रकल्प आशोक काकडे बुलढाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या कार्यासाठी पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार साहेब, पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव,साहेब सहाय्यक,संजय धुमाळ,हैदर शेख,श्रीकांत सपकाळ,शरद वाणी,प्रलाद खरात,रुपसींग गुसींगे,ज्ञानेश्वर ठाकूर,प्रवीण केनी,रीयाज बोधी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या डॉक्टर रंजना प्रशांत दंदे, संत रोहिदास शिक्षण प्रसारक मंडळाच्या मनीषा शेरखाने,लिंबाई बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कविता भगत आणि योगेश संतोष थोरात,समाजसेवक सुमित पंडित यांनी मदतकार्य केले.