लक्ष्मीची साथ व देवाचा हात पाठीवर असल्याने संशयित महिला अद्यापही सापडेना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील एका दलित कुटुंबातील २० वर्षीय तरुणीवर एका महिलेच्या मदतीने जिवे मारुन टाकण्याची धमकी देत शरीर संबंध ठेवण्यासाठी भाग पाडून आरोपी गोपाल पाटील याच्या शेतातील पत्री शेडमध्ये तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला यातून ती गरोदर राहून तिने एका मुलीला जन्म दिला आहे.
याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला दिनांक २५ फेब्रुवारी गुरुवाररोजी सायंकाळी सहावाजेचे सुमारास पिडीत तरुणीने स्वता हजर होऊन फिर्याद दिल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
मात्र आरोपींना मदत करणारी मुख्य सुत्रधार संशयित आरोपी महिला समीनाबाई लुकमान तडवी. अद्यापही फरार असल्याने हीचा पिंपळगाव पोलिस व पाचोरा डी.वाय.एस.पी.श्री. भारतजी काकडे व त्यांचे सहकारी कसून शोध घेत आहेत.
परंतु ही महिला अद्यापही फरार असल्याने तपासात व्यत्यय आला असून ही महिला पोलिसांना सापडल्यास सत्य समोर येईल व या प्रकरणात अजुनही काही नावांची भर पडून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा पिंपळगाव हरेश्वर परिसरात जनमानसातून दबक्या आवाजात सुरु आहे.
तसेच आरोपी महिला न सापडण्या मागचे कारण म्हणजे या प्रकरणात तडजोड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पैकी स्वताला प्रतिष्ठित समजून घेणारा एक व कायदा आमच्या बापाचा समजणारा एक हे दोघे सुद्धा फरार असल्याची चर्चा पिंपळगाव हरेश्वर गावात दबक्या आवाजात बोलले जात असून यांचे पाठबळ महिलेच्या पाठीशी असल्याने पोलिसांना सद्यस्थितीत यश येत नसले तरी पोलिस या महिलेला शोधून काढतीलच व पिडीतेतेला न्याय मिळवून देतीलच अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणातील वारंवार अत्याचार करणारे निंबा सावळे, निलेश, शिवाजी, गोपाल पाटील, बापू उर्फ संजु आढाव सर्व पिंपळगाव हरेश्वर यांच्या विरोधात तक्रार दिली. गुन्हा रजिस्टर नंबर ३१/२०२१ भा.द.वी.कलम ३७६, ३७६ड,३७६(२), (एन) ५०४, ५०६, ३४ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.