अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी मा.ना.श्री.दादाजी भुसे साहेब आज पाचोरा तालुक्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०९/२०२१
मागील आठवड्यापासून निसर्ग कोपला आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे सगळीकडेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी जिवीत हानी झाली आहे. या झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी मा.ना.श्री.दादाजी भुसे साहेब कृषी व माजी सैनिक कल्याण तथा पालकमंत्री पालघर जिल्हा हे आज पाचोरा तालुक्यातील झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी येत आहेत.
या दौऱ्यात आज सकाळी ११ वाजून २० मिनीटांनी ते पाचोरा तालुक्यातील दिघी, ११ वाजून ४५ मिनीटांनी भोरटेक, दुपारी १२ वाजता कजगाव येथील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जावून अतिवृष्टीने झालेल्या पीक परिस्थीतीची व नुकसानीची पाहणी करून आढावा घेणार आहोत. नंतर एक वाजता शासकीय विश्रामगृह पाचोरा आगमन व राखीव नंतर १ वाजून १० मिनीटांनी आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट व दुपारी २ वाजता पाचोरा येथून चाळीसगाव मार्गे मालेगाव कडे रवाना होणार आहेत.