फक्त लोकप्रतिनिधींसाठी वरखेडी ते कुऱ्हाड रस्त्यावर स्वयंचलित दुचाकी स्पर्धांचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०१/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी ते कुऱ्हाड या रस्त्यावर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून फक्त लोकप्रतिनिधींसाठी स्वयंचलित दुचाकींची स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे.
तरी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाचोरा व जामनेर तालुक्यातील आजी, माजी आमदार, जिल्हापरिषद सभापती, उपसभापती, सदस्य, पंचायतसमिती सभापती, उपसभापती, सदस्य तसेच पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीचे आजी, माजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी त्वरीत आपल्या नावाची नोंदणी करुन या स्पर्धेत भाग घेऊन पंचक्रोशीतील जनतेच्या भावनांचा आदर कराव अशी विनंती सत्यजीत न्यूज कडून करण्यात येत आहे.
【 रस्ते सुरक्षितता हा जिवन मरणाचा प्रश्न आहे. 】
स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना स्पर्धेचे नियम, अटी व बक्षीसांची संपूर्ण माहिती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेशिका भरतांना सविस्तर देण्यात येईल.
तरी त्वरित संपर्क साधुन आपला सहभाग नोंदवून या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती.