स्वताचे दुःख विसरून स्वतःच्या डोळ्यातील अश्रू लपवत पूरग्रस्तांचे अश्रू पुसणारा आमदार किशोर आप्पा पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०९/२०२१
काल कुटुंबातील जेष्ठ सदस्याचे निधन झाले परंतु त्या घटनेने खचून न जाता आपल्या मतदार संघावर आलेले अतिवृष्टिचे संकट व त्यात अड़केलेली जनता यांचा विचारने काल अगदी सकाळ पासून अगदी जिल्हाधिकारी ते पालकमंत्री यांच्या पासून ते नुकसान ग्रस्त गावातील सामान्य शाखा प्रमुखच्या संपर्क ठेवून जनतेला धीर देण्याचे काम अप्पा करत होते…कुटुंबावर एकीकडे दुःखचा डोंगर कोसळलेला असताना ते दुःख बाजूला ठेवून संध्याकाळी पाचोरा शहरातील हिवरा नदी परिसरची पाहणी करून अप्पाणी दिघी नेरी कजगाव भोरटेक आदि गावात परिसरात झालेल्या नुकसानीची माहिती जि प सदस्य रावसाहेब जिभाऊ पाटिल यांचे कडून घेऊन रात्री तुन पुर पाणी कमी अधिक होऊ शकते त्याबद्दल काळजी घेण्याच्या सूचना करून अगदी आज सकाळीच प्रांत साहेब,तहसीलदार साहेब, इंजीनियर महसूल विभाग याना घेऊन या पुरग्रस्त भागची पाहणी करून व अजुन कुठे काय काय नुकसान जीवित व वित्त हानी झाली आहे का याबद्दलची माहिती जि.प सदस्य रावसाहेब जिभाऊ यांचे कडून घेऊन झालेल्या नुकसानचे स्पॉट पंचनामे करण्याचे आदेश देऊन शक्य त्या उपाय योजना करण्याचे सांगितले.