ओबीसी आरक्षण वाचविण्या संदर्भात समता परिषदेसह विविध ओबीसी संघटनांचे पारोळा तहसीलदार यांना निवेदन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/११/२०२०
पारोळा ता पारोळा आज दिनांक २६ रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पारोळा तालुका व विविध ओबीसी समाजाच्या संघटना व सर्व बहुजन समाज संघटना वंचित बहुजन आघाडी पीपल्स रिपब्लिकन पार्टी पारोळा तालुका यांच्या वतीने ओबीसी आरक्षण वाढविण्यासंदर्भात तहसीलदार पारोळा यांना मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले पारोळा येथील शाळा क्रमांक एक च्या गेट जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या चे पूजन करून पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली तर मोर्चाद्वारे संविधान दिनानिमित्त महामार्ग क्रमांक सहा वरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा जुने तहसील कार्यालय पर्यंत काढण्यात आला यावेळी मोर्चात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व विविध ओबीसी समाजाच्या संघटना बहुजन समाजाच्या संघटना वंचित बहुजन आघाडी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व सर्व ओबीसी समाजाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते समता सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी मोर्चात ओबीसी बचाव आरक्षण बचाव आरक्षण बचाव संविधान बचाव ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ओबीसींना संख्येनुसार आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के ही माफी मिळाली पाहिजे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र उत्पन्नाची मर्यादा वाढवली पाहिजे यासह ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी सरकारने देशातील नामवंत वकील देऊन ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे यासह अनेक मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार बी आर शिंदे यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाजन दिनेश पाटील माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्याम पाटील समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बापू महाजन,मीडिया प्रमुख भगवान रोकडे नगरसेवक प्रकाश महाजन नगरसेवक धिरज महाजन समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे तालुका अध्यक्ष वना म्हाजन,ग्राहक संरक्षण मंचचे राज्य सदस्य विकास महाजन सुभाष महाजन सोनार समाजाचे अध्यक्ष प्रभाकर भालेराव कासार समाजाचे अध्यक्ष संजय कासार बडगुजर समाजाचे पदाधिकारी प्रवीण बडगुजर चौधरी समाजाचे सचिव भरत चौधरी वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष गौतम पवार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवान सोनवणे माळी समाजाचे अध्यक्ष रमेश महाजन दशरथ महाजन धिरज महाजन समता परिषद उपाध्यक्ष योगेश रोकडे शहराध्यक्ष धनराज महाजन छोटू महाजन आकाश महाजन दिलीप महाजन नामदेव माळी,गुलाब पेंटर,गजेंद्र महाजन,सुनील माळी, देवा महाजन गोकुळ मिस्त्री रमेश विश्राम महाजन आबा दादा महाजन ज्ञानेश्वर यशवंत महाजन गोपाल दादा महाजन रमेश सदा महाजन रामदास लक्ष्मण माळी भगवान माळी सुनील महाजन सुभाष महाजन यशवंत भिमराव माळी जगदीश माळी उत्तम माळी गणेश माळी मनोज माळी गुलाब माळी किरण कासार अनिल तांबट दिलीप कासार दिनेश अहिरराव योगेश रोकडे प्रल्हाद महाजन रामदास महाजन कैलास महाजन जिभाऊ महाजन मनोज माळी गोकुळ माळी सुनील सरदार निंबा महाजन धिरज महाजन कैलास महाजन ईश्वर माळी निंबा माळी तसेच सर्व ओबीसी समाजबांधव बहुजन समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते समता सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष संतोष महाजन यांनी मोर्चाला संबोधित करताना व तहसीलदार यांना निवेदन देत असताना विविध मागण्या ओबीसी समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात अशी विनंती केली याप्रसंगी त्यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने माननीय उच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालयात नामवंत वकील नियुक्त करावे तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच ओबीसी आरक्षणात कोणताही फेरबदल करू नये व आरक्षणाची टक्केवारी कमी करण्यात येऊ नये तसेच ओबीसी संवर्गातील संख्या वाढल्याने आरक्षणात टक्केवारीनुसार वाढ करण्यात यावी व ओबीसी सन वर्गाला शासकीय नोकऱ्यांमध्ये पदोन्नती देण्यात यावी शैक्षणिक क्षेत्रात ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना पूर्ण शंभर टक्के फी माफी च्या सवलती लागू करण्यात याव्यात ओबीसी संवर्गातील जातिनिहाय जनगणना करण्यात यावी ओबीसी महामंडळाच्या संख्येनुसार निधी वाढवून देण्यात यावा नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राच्या उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यात यावी यासह विविध मागण्या केल्या त्यांनी याप्रसंगी आज आज २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या व २६ नोव्हेंबर रोजी मुंबई वर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत शहीद पोलीस कर्मचारी अधिकारी यांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चा विसर्जित करण्यात आला.