केंद्रशासनाने केलेल्या रासायनिक खते , पेट्रोल ,डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०५/२०२१
पाचोरा प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन.
सद्या सर्वदूर कोरोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी मागील वर्षापासून सुरु असलेले सततचे लॉकडाऊन त्यातल्यात्यात कधी अवकाळी पाऊस तर कधी वादळ वारा, पिकांवर पडलेल्या अनेक घातक किटकांचा सामना करण्यासाठी महागड्या फवारण्या शेती मशागत, मजुरी ,बि, बियाणे खर्च निंदणी, कोळपणी इतर मशागत करत करत जेमतेम हाती आलेली पिके घेऊन बाजारपेठ गेल्यानंतर शेतीमालाला योग्य भाव नाही, शासकीय खरेदी बंद व आता यावर्षी पून्हा लॉकडाऊनचा फटका बसल्याने हातात पैसा नसतांना शेतकरी उधार, उसनवार करत पुढच्यावेळी शेतात चांगले पिक घेऊ हे स्वप्न उराशी बाळगून असतांनाच
केंद्रसरकारने रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये ५००/०० ते ७०० रुपये दरवाढ केली आहे. तसेच पेट्रोल, डीझेल, घरगुती गॅसच्या दरवाढ ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
म्हणून केंद्रसरकारने रासायनिक खतांवर सबसिडी देऊन पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती त्वरित कमी करुन या वाढत्या महागाईत भरडल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लॉकडाऊनच्या नियमांचे पाळून केंद्रसरकारचा जाहीर निषेध करत पाचोराचे प्रांताधिकारी मा.श्री. राजेंदजी कचरे साहेब यांना निवेदन दिले.
तसेच केंद्रसरकारने त्वरित दरवाढ कमी करुन शेतकरी व सर्वसामान्य जनतेला न्याय न दिल्यास लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
निषेधाचे निवेदन देतांना राहुल बोरसे, बाबाजी ठाकरे,सुदर्शन सोनवणे युवक शहराध्यक्ष, प्रा.प्रदीप वाघ,प्रा.नितीन पाटील,संतोष महाजन,मयुर पाटील,उमेश एरंडे,सचिन शिंदे,निलेश पाटील,गौरव पाटील,संदीप महालपुरे, इत्यादी कार्यकर्ते हजर होते.