पाचोरा येथे २५ वर्षीय अनोळखी तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत केली आत्महत्या, ओळख पटवण्याचे रल्वे प्रशासनाचे आवाहन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०५/२०२३

आज दिनांक २९ मे २०२३ सोमवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एका २५ वर्षीय अनोळखी तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली असून या आत्महत्याग्रस्त तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक २९ मे २०२३ सोमवार रोजी सकाळी अकरा ते सव्वा अकरा वाजेच्या सुमारास एका २५ वर्षीय तरुणाने गाडी क्रमांक २०६५८ या धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली आहे. या आत्महत्या ग्रस्त मयत तरुण रंगाने गौरवर्णीय असुन त्याच्या अंगावर निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, फिकट पिवळ्या रंगाचा फुल बाहिचा शर्ट, लाल रंगाची निकर तसेच उजव्या हातावर इंग्रजीत S व मराठीत सुनील असे गोंदवलेले असून या वर्णनाच्या इसमा बाबत कोणालाही काही माहीत असल्यास किंवा याला ओळखत असल्यास ९०२८१५२९६७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे विभागाचे उपनिरीक्षक मा. श्री. ईश्वर बोरुडे साहेब यांनी घटनास्थळी धाव घेतली व ॲम्बुलन्स चालक बबलू मराठे यांच्या मदतीने आत्महत्याग्रस्त तरुणाचा मृतदेह ओळख पटवण्यासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालय ठेवण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या