दर्जेदार काम होण्यासाठी स्थानिक नागरिकांनी लक्ष द्यावे -आमदार अशोक पवार.
स्नेहा मडावी (पुणे)
दिनांक~११/०६/२०२१
शिरूर तालुक्यातील घोड धरणाच्या खालील बाजूस पोहचलो रस्ता दुरुस्ती करणे व धरणाच्या दोन्ही बाजूस विमोचकाचे बांधकाम दुरुस्ती करणे या कामाचे भूमी पूजन शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार ऍड अशोक पवार यांनी ऑनलाईन केले.
आमदार अशोक पवार यांनी जलसंपदा विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून 34 लाख रुपये मंजूर करून घेतले.
या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. चिंचणी ग्रामस्थांना जाणे येण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत होता.
चिंचणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. या मागणीची धखल घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा करून या रस्त्याच्या कामासाठी 34 लाख रुपये मंजूर करून आणल्या बद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.लगेंचच या कामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कामाची पाहणी घोड धरण चिंचणी शाखा अभियंता किरण तळपे, ठेकेदार मंगेश जगताप शिवसेना उपतालुका प्रमुख अनिल माणिक पवार, ग्रामपंचायत सदस्य अनिल सुभेदार पवार, बाळासाहेब पवार गोरख पवार, हनुमंत पवार,माजी उपसरपंच नामदेव पवार, पाठबंधारे स्थानिक कर्मचारी दादा पवार, वाल्मिक नागवडे यांनी केली.