बापाच्या मारेकऱ्यांचे झेंडे खांद्यावर मिरवणाऱ्या अवलादिंनो, आता तरी सरकारच्या शेतीविरोधी धोरणांबद्दल चीड येऊ द्या. संतोष पाटील

दिनांक~३०/०१/२०२३
बापाच्या मारेकऱ्यांचे झेंडे खांद्यावर मिरवणाऱ्या अवलादिंनो, आता तरी सरकारच्या शेतीविरोधी धोरणांबद्दल चीड येऊ द्या.
संतोष पाटील
—————————————————–
भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशांमध्ये ७० टक्के जनता शेती व शेतीशी संलग्न व्यवसायांवर आपला चरित्रार्थ चालवते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र आता या शेती व्यवसायाला घरघर लागलेली आहे, शेतकऱ्यांच्या विरोधी असलेले कायदे आणि सरकारची नकारात्मक भूमिका या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहेत. काल सुनील चरपे साहेबांची लोकमतला एक बातमी वाचली आणि डोकं सुन्न झालं मी आधी असं म्हटलं होतं की कापसाच्या दराबाबत झारीतला शुक्राचार्य कोण ? या प्रश्नाचे उत्तर चरपे साहेबांच्या बातमीने मिळालेलं आहे,
‘सेबीने, जानेवारी २०२३ पासून कापसाचे वायदे तात्पुरते बंद केले आहे, सेबीच्या कार्यालयावर काढलेल्या मोर्चा नंतर सेबीने थोडीशी अनुकूलता दाखवली असताना आता पीएससी याला विरोध करत आहे, मुळात हे सर्व होण्यामागे केंद्र सरकारचा हात आहे हे सूर्या इतकं स्पष्ट असताना या देशातील काही प्रमुख शेतकरी संघटना व कार्यकर्ते का उठाव करत नाही, व आपल्या नेत्याचे आपल्या बापाच्या मारेकऱ्याचे झेंडे खांद्यावर मिरवणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरांना अजूनही का चिड येत नाही या गोष्टीचे नवल वाटते.
परदेशातून कापूस व इतर शेतमाल आयात करून आपल्या देशातील कापसासहीत नऊ शेतमालांचे बाजार भाव केंद्र सरकारने पाडलेले आहेत, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्याचा बळी घेणे व व्यापारी वर्गाला झुकते माप देणं कितपत योग्य आहे, सेबी, पीएसी यांच्यावर सरकारचे नियंत्रण असून निव्वळ शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये काम करण्यासाठी याचा वापर करण्यात येत आहे, *पीएसी* च्या कमिटीमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या एकाही संघटनेचा सहभाग नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
सुनील चरपे साहेबांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली बातमी वाचल्यानंतर नेमकं कुठे पाणी मुरतंय हे लक्षात येते, कापसाच्या दरवाढीची अनिश्चितता लक्षात आल्यावरही कुठलीही शेतकरी संघटना रस्त्यावर आल्याचे दिसत नाही आणि शेतकऱ्यांची पोरं आपल्या उघड्या डोळ्यांनी शेतकरी बापाचं मरण पाहत आहेत……
संतोष पाटील
7666447112