दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/१२/२०२३

आज पाचोरा, भडगाव तालुक्याच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते, शिवसेना जळगावचे जिल्हाप्रमुख मा. श्री. दिपकसींग राजपूत व शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११ वाजता पाचोरा शहरातील मध्यवर्ती शिवतीर्थ शिवसेना कार्यालयात शिव दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या शुभ प्रसंगी सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य, महत्वपूर्ण नोंदी व दैनंदिन जीवनातील दिनदर्शिकेचे महत्त्व विशद करत माननीय शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे मतदार संघावरील प्रेम व स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्यावरील नितांत प्रेमाची आठवण करुन दिली व मागील सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी समाजहितासाठी केलेल्या कार्याचा आढावा मांडला. तसेच शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटील यांनी येत्या २३ डिसेंबर २०२३ शनिवार रोजी सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असून या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा पत्रकार बांधवांसमोर मांडली यात दुग्धशर्करा योग म्हणजे पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. श्री. राहुलजी संघवी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

या शुभप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिपक पाटील, भडगाव तालुकाप्रमुख शरद पाटील, पाचोरा शहरप्रमुख अनिल सावंत, विनोद बाविस्कर, पप्पू राजपूत, भरत खंडेलवाल, मनोहर चौधरी, संदीप जैन, युवा उपाधिकारी, शशिकांत पाटील, राजेंद्र राणा, पप्पू सावंत, दादाभाऊ चौधरी, मनोज चौधरी, आनंद संघवी, राहुल सांगवी, गफार भाई, ज्ञानेश्वर चौधरी, समाधान हटकर, खंडू सोनवणे, हरीश देवरे, अभिषेक खंडेलवाल, विनोद राऊत धरमसिंग पाटील, गांगुर्डे साहेब डी. डी. नाना, नंदू सर, राजू गायकवाड, शुभम राजपूत, सुनील पाटील सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक नाना भाऊ वाघ यांनी केले.