शेतकऱ्यांना अनुदान व रेशनिंगचे धान्य पुरेपूर व वेळेवर मिळावे म्हणून कॉंग्रेस काढणार शिंगडा मोर्चा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०३/२०२२
पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे राहीलेले अनुदान त्वरीत मिळावे तसेच पाचोरा शहरासह तालुक्यातील रेशन वाटपातील सुरु असलेला घोळ मिटवून सर्व रेशनकार्ड धारकांना मोफतचे व स्वस्त धान्य पुरेपूर व दरमहा वेळेवर मिळावे याकरिता पाचोरा येथील कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मा.श्री. सचिन दादा सोमवंशी यांच्या नेतृत्वाताखाली दिनांक २१ मार्च २०२२ सोमवार रोजी पाचोरा येथील आठवडे बाजारातुन ते थेट तहसील कार्यालयापर्यंत भव्य सिंगाडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
हा मोर्चा काढण्यामागचा हेतू असा की मोर्चात प्रमुख मागण्यात पाचोरा शहरासह तालुक्यातील गावागावात स्वस्त धान्य दुकानातून जानेवारी २०२२ चा मोफत धान्यचा पुरवठा झालेला नाही म्हणून तो त्वरीत वाटण्यात यावा, तसेच पाचोरा शहरातील जवळपास २२०० शे दारीद्र रेषेखालील कुटुंब आहेत. मात्र पैकी केवळ चार कुटुंबांना लाभ दिला जात असून इतर बी.पी.एल. धारकांना त्यांच्या हक्काच्या धान्याचा मागील विस वर्षापासून लाभ मिळत नसल्याने त्यांच्यावर एकप्रकारे अन्याय होत आहे. अश्या वंचित कुटुंबाना तात्काळ समाविष्ट करण्यात येऊन तात्काळ धान्य वाटप करावे. तसेच ज्यांच्या हलगर्जीपणामुळे बी.पी.एल. धारक मागील विस वर्षांपासून वंचित राहिले त्यांची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.
तसेच पाचोरा शहर व तालुक्यात काही मयत लाभार्थीच्या नावे धान्य पुरवठा केला आहे तो बंद करण्यासाठी संबंधित लाभार्थींनी संबंधित दुकानदारांना वेळोवेळी सुचित करुन सुध्दा त्यात बदल केला केला नाही. अशा बेजबाबदार दुकानदारासह संबंधित अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. विधवा, परीतक्ता, दिव्यांग, अनाथ यांना बी.पी.एल. मध्ये समाविष्ट करण्यात यावे इत्यादी मागण्या रेशनकार्ड धारकांच्या आहेत.
तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे राहीलेल्या अनुदान अद्यापही वाटप करण्यात आलेले नसून ते तात्काळ वाटप करण्यात यावे. अनुदान वाटप करतांना वैगरे असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची अडवणूक न करता तात्काळ मोबदला देण्यात यावा. शासकीय तुकडा बंदी कायदा असतांना त्याची अंमलबजावणी न करता बेकायदेशीर खरेदी होत असुन या खरेदी, विक्रीच्या बेकायदेशीर नोंदी करणाऱ्या तलाठ्यांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासह अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदार मा.श्री. कैलासजी चावडे यांना देण्यात आले असून यावर त्वरीत तोडगा न काढल्यास तहसील कार्यालयावर भव्य शिंगाडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दिला आहे.
आज मा.तहसीलदार साहेबांना निवेदन देते वेळी शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, राजेंद्र महाजन, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अॅड अंबादास गिरी, संगिता नेवे, कुसुम पाटील, अॅड मनिषा पवार, अॅड वसिम बागवान, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, युसूफ टकारी, प्रदीप चौधरी, कल्पना निंबाळकर, स्मिता कासार, राहुल शिंदे, गणेश पाटील, कल्पेश येवले व बहुसंख्य कार्यकर्ते हजर होते.