पाचोरा शहर तेली समाजाची नूतन कार्यकारिणी जाहीर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२१
पाचोरा येथे तेली समाजबांधवांची नुकतीच एक छोटेखानी सभा घेऊन या साधारण सभेत सर्व तेलीबांधवांच्या संमतीने व सर्वानुमते सन २०२१/२२ ते २०२६/२७ या कालावधीसाठी पाचोरा शहर तेली समाजाच्या अध्यक्षपदी मा.श्री. नारायण चौधरी, उपाध्यक्षपदी डॉ. मा.श्री. उत्तमराव चौधरी तर सचिवपदी मा.श्री. शांताराम चौधरी सहसचिवपदी मा.श्री. शरद चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली.
ही साधारण सभा श्री. संजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली या कार्यकारणीत सदस्य विश्वस्त खालील प्रमाणे सतीश चौधरी, प्रकाश चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, पी.एन.चौधरी, बापू चौधरी, मोतीलाल चौधरी, संजय चौधरी, आमंत्रित सदस्य पंडित चौधरी, गोपाल चौधरी, दिनकर चौधरी, संजय चौधरी, जगदीश चौधरी, सुधाकर चौधरी, किशोर चौधरी, भरत चौधरी, आबा चौधरी, नितीन चौधरी, सल्लागार सदस्य प्राध्यापक सी,एन, चौधरी जगन्नाथ चौधरी, भालचंद्र चौधरी, शिवाजी चौधरी, नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्यांचे पाचोरा शहर तेली समाजाच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण चौधरी तर आभार शांताराम चौधरी यांनी केले सर्वसाधारण सभेला पाचोरा शहर तेली समाजाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते