दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२३

सद्यस्थिती अन्याय, अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना पाचोरा तालुक्यात घडली असून अल्पवयीन मुलास बळजबरी संबंध करण्यासाठी भाग पाडून त्या घटनेचा व्हिडीओ तयार करुन त्याला खंडणी मागण्यासह मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील एका गावातील व सध्या जळगाव येथे राहत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.

पाचोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलास दारू पाजून दारूच्या नशेत त्याच्याशी शारीरीक संबंध केला. या घटनेचा व्हिडिओ काढुन तो व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळले. मात्र पिडित मुलाच्या वडिलांना ही माहीती मिळाल्यावर त्यांनी जाब विचारला असता त्यांना शिविगाळ करीत मारहाण केली. झालेला त्रास सहन न झाल्याने पिडित मुलाने पाचोरा पोलिसात धाव घेतली.

याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात एका महीलेसह चार जणांविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात मार्च २०२० ते २० नोव्हेंबर २०२३ या काळात ही घटना घडली. १७ वर्ष ७ महिने वयाचा हा मुलगा मार्च २०२० मध्ये लागल्यानंतर लॉकडाउन मुळगावी माहेजी येथे सहपरीवार आला होता. तेथे तो मित्रासोबत राहू लागला. मित्राच्या घरी जाणे, येणे सुरू झाले असता त्याला दारू पाजण्यात आली. दारूच्या नशेत असतांना मित्राच्या नात्यातील महिलेने बळजबरीने शारिरीक संबध करण्यात भाग पाडले. व त्याचा व्हीडीओ बनवून ५० हजार रूपये आणुन दे नाहीतर व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली.

तेव्हा त्या मुलाने घरातून पैसे व दागिने आणून दिले. नंतर परत अशीच मागणी केली. दोन वेळा असेच घडल्यानंतर मुलाने वडीलांना माहीत दिली कथित महीला व शेख यांचे विरूध्द भाग ०५ गुरन ४६८/२३ भादवी ३८४, ३२३, ५०४, ५०६, ३४ व बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १२ व १५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढिल तपास पोलीस उपनिरिक्षक योगेश गणगे करीत आहेत. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.