दुसऱ्यांच्या ऐकून झाल्या गप्पा, आता आमचा नेता किशोर आप्पा, अमोल शिंदेंना दे धक्का, विठ्ठलाच्या साक्षीने अनिल शिंदेसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०७/२०२३

काल दिनांक ०३ जुलै २०२३ सोमवार रोजी पाचोरा तालुक्यातील गाळण येथील असंख्य भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत विठ्ठलाच्या साक्षीने शिवसेनेत प्रवेश केला. यात भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तथा गाळण ग्रामपचायतीचे सदस्य अनिल पाटील, गाळण विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन सचिन पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, माजी सरपंच रोहिदास पाटील उर्फ (गोटु नाना), यांच्यासह शंभराहून अधिक कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने भाजपात प्रवेश केला. यामुळे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी मा. श्री. अमोलभाऊ शिंदे यांना पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला आहे.

याप्रसंगी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन स्वयंस्फूर्तीने शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा, भडगाव तालुक्यात विविध प्रकारची विकासकामे आणून गाळण बुद्रुक, गाळण खुर्द, हनुमानवाडी, बिष्णु नगर व दोघह तालुक्यात जनतेसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. व आजही दररोज एकतरी विकासकामांचे उद्घाटन किंवा लोकार्पण सोहळा पार पडत आहे. तसेच गोरगरिबांना आरोग्यसेवेसह शासकीय योजनेतून आर्थिक मदत करत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. तसेच आप्पासाहेब किशोर आप्पा पाटील हे जनतेसाठी चोवीस तास सेवा देत असून (हात दाखवा, गाडी थांबवा) अश्या पध्दतीने आपल्या मतदारसंघात फिरुन रस्त्यावर, शेतात, कार्यालयात, घरी तसेच चोवीस तास भ्रमणध्वनीवर जनतेच्या संपर्कात असून भेटतील तिथे जनतेच्या समस्या ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी अहोरात्र तयार असतात म्हणून आम्ही भाजपाला सोडून आज शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगितले.

या प्रवेश सोहळ्याच्या शुभप्रसंगी गाळण येथील विठ्ठल मंदिरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, शहरप्रमुख किशोर बारावरकर, जेष्ठ कार्यकर्ते व पत्रकार प्रवीण ब्राम्हणे, डॉ. बी. बी. पाटील, तालुका समन्वयक ॲड. दिपक बोरसे पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अनिल पाटील, सरपंच आत्माराम राठोड, उपसरपंच ईश्वर पाटील, माजी सरपंच राजेंद्र राठोड इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे शेवटी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा, भडगाव तालुक्यातील केलेल्या, मंजूर झालेल्या व प्रस्तावित विकासकामांचा लेखाजोखा मांडला व शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केला या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल व विकासकामांसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही दिली. तसू रावसाहेब पाटील, सुनील पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नितीन राजपूत यांनी तर आभारू ॲड. दीपक बोरसे पाटील यांनी केले .

ब्रेकिंग बातम्या