पाचोरा शहराचा कायापालट करणारे विकासाचे महामेरू आमदार किशोर आप्पा पाटील.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/११/२०२१
सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन किशोर आप्पा पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर पाचोरा भडगाव विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून भगवा झेंडा फडकवला.
त्या पंचवार्षिक च्या कालावधीत पाचोरा भडगाव शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विकास गंगा आणली. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध जटील समस्या सोडविण्याकडे कडे लक्ष दिले. २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण डोळ्यासमोर ठेवून नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष केंद्रित केले आणि पुन्हा एकदा २०१९ मध्ये पाचोरा भडगाव मतदार संघावर भगवा कायम ठेवला. आज त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने शहरातील झालेली विकास कामे सुरू असलेली कामे व पुढील प्रस्तावित कामांचा हा लेखाजोखा
रस्ता व गटारीची समस्या सोडविली
शहरातील जनतेला गटारीची समस्या भेडसावत होती. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शासन स्तरावर या विषयी पाठपुरावा करून संपूर्ण शहरासाठी ६० कोटी रुपयांचे भूमिगत गटाराचे काम मंजूर करून आणत पूर्णत्वास नेले. उर्वरित भागातील गटारीची कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. शहराच्या दिवसेंदिवस वाढत जाणारऱ्या कॉलनीतील नागरिकांना सुविधा देत संपूर्ण शहरात कॉक्रीटीकरण करण्याच्या कामांना प्रारंभ केला आहे. जामनेर रस्ता, पूर्ण गाव रस्ता, बस स्टॅन्ड रस्ता, रेल्वे स्टेशन रस्ता, व्हीपी रस्ता इत्यादी मुख्य रस्त्यांसोबत शहरातील विविध भागात रस्ता कॉकिटीकरणाची कामे प्रगतिपथावर आहेत.
वाचनालयाचा प्रश्न सोडविला शहराच्या मुख्य ठिकाणी व मध्यभागी असलेल्या वाचनालयाची अतिशय दुरावत दुरवस्था झालेली होती. बाचकांना व्यवस्थित बैठक व्यवस्था नव्हती, शालेय विद्याथ्र्यांना चांगल्या सुविधा नव्हत्या. ही गरज लक्षात घेता शिवाजी महाराज चौकात प्रशस्त वाचनालयाची इमारत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उभी केली. आता त्या ठिकाणी वाचकांना चांगली व्यवस्था उपलब्ध झाली आहे व अनेक पुसकांचा लाभ याठिकाणी वाचक घेऊ शकतात.
रस्त्यांसोबतच रस्त्यांच्या शुशोभीकरणावर
मोरी चे काम पूर्ण झाले असून कृष्णापुरी, पांचाळेश्वर व बाहेरपुरा भागातील पुलांची कामे सुरू झाली आहेत. यामुळे पाचोरा शहर व परिसरातील नागरिकांना अतिवृष्टी मुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळेल.
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला होणार अनेक विकास कामांची सुरुवात
दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ४२ कोटी रुपये रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करीत आहेत. यापूर्वी ६० कोटी रुपये खर्चून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू असून ९० टक्के कामे पूर्ण झाले आहे. शहरातील विविध कॉलनी भागामध्ये २८ कोटी ७२ लाख रुपयांचे काँक्रिटीकरणासह ३ कोटी २२ लाखांचे गटारीचे काम सुरू आहे..
प्रस्तावित कामे
अजूनही शहराच्या काही भागात व्यावसायिकांसाठी भव्य व्यापारी संकुलनाची आवश्यकता लक्षात घेता विविध ठिकाणी व्यापारी संकुलन उभारणे, जलतरण तलाव, इंडोर गेम स्टेडियम, भव्य नाट्यगृह, भडगाव रोड परिसरात सुसज्ज अशी भाजीमंडी, नगरपालिका जिनात व्यापारी संकुलन, गिरणा धरणावरून पाचोरा शहरवासीयांसाठी रस्त्यालगत पाइपलाइन करून शुद्ध पाणीपुरवठा करणे इत्यादी कामे अद्याप प्रलंबित असून या कामांचा पाठपुरावा सुरू आहे व आगामी काळात लवकरच ही सर्व प्रलंबित कामे पूर्णत्वास आणली जातील.
शहराच्या विविध कॉलनी मध्ये असलेल्या पाचोरा नगरीचे विकास कामे करत असताना शहराची स्वच्छता कशी राखता येईल यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भर दिला. या उद्देशाने शहरात ठिकठिकाणी १७ नवीन अत्याधुनिक शौचालयाची निर्मिती केली. शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत डम्पिंग ग्राउंड प्रकल्प सुरू केला. कचरन्यापासून जैविक खत निर्मिती करून कचऱ्याचे व्यवस्थापन केले. तसेच शहरातील कचरा घराघरापासून जमा करण्यासाठी अनेक घंटा गाड्यांची व्यवस्था उपलब्ध केली,
राम मंदिर परिसरात पर्यटन उभारणार प्राचीन राम मंदिराच्या जागेवर भव्य सभागृहाची निर्मिती व त्या ठिकाणी पर्यटन विकास विभागामार्फत अनेक कामे प्रस्थापित आहेत. या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून लवकरच राम मंदिर परिसरात भव्य पर्यटन उभारण्यात येणार आहे. यामुळे पाचोरा शहराची एक आगळी वेगळी ओळख निर्माण होईल आणि अनेक प्रेक्षक या प्रेक्षणीय ठिकाणी भेट द्यायला येतील यामुळे रोजगार निर्मिती होईल.
विविध ठिकाणच्या पुलांची कामे सुरू पावसाळ्यामध्ये होणाऱ्या नागरिकांच्या गैरसोई चा विचार र किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा शहरात चार पुलांची कामे सुरू केली यापैकी बस स्टैंड रोड परिसरातील शहरातील मुख्य रस्ते फक्त काँक्रिटीकरण न करता त्या रस्त्यांचे सुशोभिकरण कसे खुल्या जागी मध्ये सुशोभिकरण करण्याचा करता येईल यावर लक्ष दिले. रस्त्याच्या आजूबाजूला पेव्हर ब्लॉक बसविले, रस्त्यावर दुभाजक बनविले, ५२०१ इलेक्ट्रिक खांबांना एलईडी लाईट बसविले, शहराच्या मुख्य प्रयत्न आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सुरू केला आहे. आजवर जवळजवळ १६ जागेवर सुशोभिकरण करण्यात आले असून आगामी काळात ३२ खुल्या जागेमध्ये सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
व्यापारांचा प्रश्न सोडविला
स्व. के एम बापू पाटील यांच्या नावाने सुसज्ज असे व्यापारी संकुल बांधून १५० गाळे व १५० भाजीपाला विक्रेते साठी चांगली सुविधा उपलब्ध करून दिली. राष्ट्रमाता जिजाऊ व्यापारी संकुलनाची इमारत उभी केली तसेच स्वर्गवासी राजीव गांधी टाऊन हॉलची अतिशय दयनीय अवस्था होऊन जीर्ण झाली असताना तेथे व्यापारी चौकात हायमास्ट दिवे बसविले यामुळे शहराच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.
स्मशानभूमीचा प्रश्न सोडविला • हिंदू स्मशान भूमी च्या समस्या सोडवित स्मशानभूमीत विविध कामे केली. हिंदू स्मशानभूमी सोबतच तडवी, बोहरी इत्यादी समाजाच्या स्मशानभूमीचे नूतनीकरण केले. तसेच मुस्लिम कब्रस्तानात चे बॉल कंपाउंड केले व कायमस्वरूपीची समस्या मागी लावली आहे.