भाजपाचे आशिष शेलारजी माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना अप्रत्यक्ष टोला मारण्या एवढी तुमची उंची नाही. :- अनिल महाजन,ओबीसी नेते.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०७/२०२१
अहो आशिष शेलारजी भाजपमध्ये आमचे नाथाभाऊ खडसे नसले असते तर तुह्मी स्वत: आणि तुमचे मित्र आजही डाळ भात खाऊन हाफ चड्डी वर कुठे तरी कवायत करत दिसले असते.आणि तुम्ही स्वत: आमदार,मंत्री झाले नसते हे नाथाभाऊ यांचे उपकार तुम्ही विसरू नये अश्या शब्दात अनिल महाजन ओबीसी नेते प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र माळी समाज महासंघ यांनी सडेतोड पणे समजावले आहे.
भाजप कार्यकर्ता आशिष शेलारजी आपण जळगावच्या स्थानिक राजकारणात डोके घालू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) बद्दल बोलण्या एवढे तुम्ही मोठे नाहीत. नाथाभाऊ खडसे यांनीच महाराष्ट्र मध्ये भाजप वाढवली आणि फळे तुह्मी खाल्लीत. हेच नाथाभाऊ भाजप मध्ये होते म्हणून तुमच्यासारखे भाजपचे कार्यकर्ते मंत्री पदापर्यंत भाजप सरकारच्या काळात पोहचू शकले हे तुम्ही विसरू नये.आमचे नाथाभाऊ नसते आणि त्यांनी महाराष्ट्र मध्ये भाजप वाढवली नसती तर तुम्ही आताही *हाफ चड्डी वर तुम्ही कुठेतरी कवायत करत दिसले असते.* तुम्ही आमदार,मंत्री होऊ शकले असते का ? असा प्रश्न विचारला असून हिंमत असेल उत्तर द्या असे सांगितले आहे.
नाथाभाऊ खडसे हे गेले चाळीस वर्ष जनतेतुन निवडून येणारे सर्वसामान्य जनतेचे व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान आहेत. तुमच्यासारखे आयत्या बिळावर नागोबा ते झालेले नाहीत. त्यांच्यावर बोलण्या एवढी तुमची कुवत नाही तुमच्या सारखे अनेक कार्यकर्त्याना त्यांनी नेता बनवले आहे हे उभ्या महाराष्ट्रला माहीत आहे. आकाशाकडे पाहून थुंकण्याचा प्रयत्न केल्यास ती थुंकी आपल्याच तोंडावर येते हे लक्षात ठेवा.
आशिषजी तुम्ही तुमचा स्वतःचा मतदारसंघ बांद्रा वेस्ट हा बघा. त्याठिकाणी अपूर्ण असलेले विकासकामे पूर्ण करा.तुमच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी भरते,तेथील नाले-गटारी बघावे लोकांना पार्किंग सुविधा नाही.जळगाव मध्ये येऊन खान्देशच्या लोकांना ग्यान देऊ नये. खान्देशचा विकास फक्त नाथाभाऊ खडसे हेच करू शकतील. नाथाभाऊ यांच्या बद्दल बोलण्यापेक्षा तुमच्या राज्यपालांना सांगा मंत्रीमंडळाने शिफारस केलेली १३ लोकांची विधानपरिषद साठी दिलेले आमदारांची लिस्ट जाहीर करा ते तुम्ही करणार नाहीत.
कारण नाथाभाऊ खडसे यांना तुह्मी घाबरतात. त्याचे कारण तुम्हाला माहित आहे . नाथाभाऊ खडसे विधानसभेत आल्यावर तुमच्या एकेकाच्या कुंडल्या हाऊस मध्ये अधिवेशनात काढतील म्हणून तुम्ही राज्यपाल महोदयांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना नाथाभाऊंना आमदार होऊ देत नाहीत ही काळया दगडावरची सफेद रेष आहे.हे तुमचे कारनामे सर्व महाराष्ट्रच्या जनतेला माहित आहे त्यामुळे अशिष शेलारजी तुम्ही पतिव्रतेचा आव आणू नका.
*जे चोर आहेत त्यांच्या मागे ईडी लागते असे तुम्ही म्हणतात. केंद्रात भाजपचे सरकार आहे आणि केंद्रीय यंत्रणा कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत हे देशात सर्वांना माहीत आहे. भाजप पक्ष मध्ये चोर नाहीत का ? भाजपमध्ये असलेले लोकांवर गुन्हे दाखल नाहीत का ? आपण कोणाला मूर्ख बनवता आहे भाजप पक्षात असलेल्या अनेक नेत्यांचे घोटाळे आहेत त्यांची ईडी चौकशी का करत नाही? भाजप मधील काही लोकांची तर ऑल रेडी ईडीची चौकशी सुरू आहे. त्याचे पुढे काय झाले. का ते भाजपवाले आहेत म्हणून त्यांची ईडीची नोटीस विड्रॉल केली गेली आहे का ? थोडक्यात आपला तो बाळ्या व दुसऱ्याच ते कार्ट अशी भूमिका भाजपा घेत आहे. आणि भाजप मध्ये असलेल्या काही लोकांची सुद्धा ईडी चौकशी सुरू आहे. मग हे लोक ही चोरच आहेत का ? याचे ही उत्तर द्या.*
भाजप मध्ये असलेले अनेक नेत्यांचे मोठे कारखाने,बॅंका, खाजगी शिक्षण संस्था, या मध्ये ही खूप मोठे गैर व्यवहार घोटाळा यांनी केले आहे. मग ह्या लोकांच्या मागे का? ईडी ही केंद्रीय तपास यंत्रणा लागत नाही याचे स्पष्टीकरण आपण द्यावे जो भाजप मध्ये आहे. त्याच्यांवर कारवाई होणार नाही. अशी रणनीती आखून आपण राजकारण करत आहात. हे लोकशाहीला धरून नाही यामुळे लोकशाहीला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. असे मत अनिल महाजन यांनी व्यक्त केले आहे.