दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०९/२०२३

मागील सन २०२२ पासून पाचोरा नगरपरिषदेवर प्रशासकीय राजवट असून या पाचोरा नगरपरिषदेचा कारभार नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती शोभाजी बाविस्कर यांच्या हातात आहे. परंतु जेव्हापासून पाचोरा नगरपरिषदेवर प्रशासकीय राजवट सुरु झाली तेव्हापासून अतिशय शांत, संयमी व शिस्तबद्ध म्हणून मिरवून घेणाऱ्या मुख्याधिकारी श्रीमती शोभाजी बाविस्कर यांनी अचानकपणे आपल्या कामाची शैली बदलवून मनमानी कारभार सुरु केला आहे. परंतु संबंधित मुख्याधिकारी ह्या महिला असल्याकारणाने कुणीही यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यासाठी धजावत नसल्याचे खात्रीलायक वृत्त ऐकावयास मिळत होते. मात्र हे ऐकिव वृत आता खरे असल्याचे स्पष्ट झाले असून याचेच जीवंत उदाहरण म्हणजे पाचोरा नगरपरिषदेला जंतूनाशके व घंटागाड्या दुरुस्ती अशी पुरवठा व सेवेची कामे केलेल्या सिटी वेस्ट मॅनेजमेन्ट सेल्स अँड सर्विसेस पाचोराचे संचालक सुरेश गणसिंग पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरुन स्पष्ट झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सिटी वेस्ट मॅनेजमेंट सेल्स अँन्ड सर्व्हिसचे संचालक सुरेश गणसिंग पाटील यांनी पाचोरा नगरपरिषदेला जंतूनाशके पुरविणे व घंटागाड्या दुरुस्ती करणे अशी पुरवठा व सेवेच्या कामाचा ठेका घेतला असून ठेका घेतांना पाचोरा नगरपरिषदेने घालुन दिलेल्या अटी व नियमांचे पालन करत आजतागायत काम केले आहेत. या केलेल्या कामाच्या मोबदल्यात दिनांक ०३ एप्रिल २०२३ पावेतो पाचोरा नगरपरिषदेकडे १५,०६,३०० इतक्या रकमेचे बिल घेणे होते. या ऐकुन बिला पैकी पाचोरा नगरपरिषदेवर असलेल्या नगराध्यक्षांनी कोणत्याही प्रकारची अडवणूक न करत ६,००,००० लाख रुपये अदा केलेले आहेत.

परंतु पाचोरा नगरपरिषदेचा लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर नगरपरिषदेचा संपूर्ण कारभार मुख्याधिकारी श्रीमती शोभाजी बाविस्कर यांच्या हातात गेल्यापासून सिटी वेस्ट मॅनेजमेंट सेल्स अँन्ड सर्व्हिसचे संचालक सुरेश गणसिंग पाटील यांनी उर्वरित बिल मिळवण्यासाठी मुख्याधिकारी श्रीमती शोभाजी बाविस्कर यांच्याकडे मागील पाच ते सहा महिन्यांपासून वारंवार भेटून उर्वरित बिलाची मागणी केली परंतु उर्वरित बिल काढून देण्यासाठी टाळाटाळ करत पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती शोभाजी बाविस्कर यांनी चक्क तिस टक्के कमिशची एकुन रक्कम २,७०,००० रुपये रोख रक्कम लेखा विभागात जमा केल्याशिवाय तुम्हाला उर्वरित बिलाचा धनादेश मिळणार नाही असे सांगून बिल काढून देत नसल्याचा आरोप करत उर्वरित बिल मिळवण्यासाठी पाचोरा विभागीय कार्यालयासमोर दिनांक २१ सप्टेंबर २०२३ गुरुवार पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सुरेश गणसिंग पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.

*सुरेश गणसिंग पाटील*
कारण आम्ही रात्रंदिवस काम केले आहे. व कामाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या उत्पन्नातून इतकी मोठी रक्कम जर आमच्याकडून मुख्याधिकारी घेत असतील तर यात संस्थेचे खुप मोठे आर्थिक नुकसान होईल. तसेच पाचोरा नगरपरिषदेकडे केलेल्या कामाचे पेमेंट बाकी असल्याने सद्यस्थितीत संस्थेची परिस्थिती आधीच बिकट झाली आहे. व त्यातून अजून २,७०,००० रुपये इतक्या मोठ्या रक्कमेची तरतूद करून दिल्यास संस्थेला मोठे नुकसान होईल. संस्थेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने खूप मानसिक तान सहन करावा लागत आहे. तसेच नगरपरिषदेकडून इतर बिले वेळेवर अदा केली जात असून फक्त आम्हाला कमिशची रक्कम न दिल्यामुळे अडवणूक केल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी लोकप्रतिनिधी असतांना अशी अडचण आलेली नाही. परंतु प्रशासक काळात आशा प्रकारे अवाजवी पैश्याची मागणी होत असल्याने आम्हाला पाचोरा विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत आहे. तरी वरिष्ठांनी माझे बिलासंबंधी न्याय द्यावा ही विनंती अशी विनंती आम्ही करत आहोत.