मा. मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्याआधीच सौ. वैशालीताई सुर्यवंशी व कार्यकर्त्यांवर पाचोरा पोलिसांकडून स्थानबध्दतेची कारवाई.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०९/२०२३
आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार व मा. श्री. गिरीशभाऊ महाजन हे पाचोरा येथे येणार असल्याने सर्वसामान्य जनतेच्या विविध अडीअडचणी तसेच गोंडगाव येथील स्व. कल्याणच्या मारेकऱ्याला लवकरात, लवकर शासन होऊन तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी व मराठा आरक्षणावर त्वरित निर्णय घेण्यासाठी तसेच नार, पार योजना, नदीजोड प्रकल्प या विषयावर निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पाचोरा तालुक्याच्या धडाडीच्या नेत्या, पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते वरखेडी नाक्यावर मंत्रीमहोदयांची वाट पाहात उभे होते.
(सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है.)
(शिंदे सरकारने लोकशाहीचा गळा घोटला असून, हुकुमशाही सुरु केली आहे. म्हणून आमच्या मागण्या ऐकुन न घेताच आमच्यावर स्थानबध्दतेची कारवाई केली.)
परंतु मंत्रीमहोदय येण्याआधीच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुल खताळ यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी, उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेत स्थानबध्दतेची कारवाई केली तसेच १४९ च्या नोटीस बजावण्यात आल्या ही कारवाई करण्यात आल्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पदाधिकारी संतप्त झाले होते. तसेच शिंदे सरकार हे हुकुमशाही पध्दतीने वागत असल्याचे मत सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
(उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटील.)
या स्थानबध्दतेच्या कारवाईत उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जळगाव उपजिल्हाप्रमुख मा. श्री. उद्धवभाऊ मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटील, उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील, शेतकरी सेना प्रमुख रमेशजी बाफना, तालुकाप्रमुख शरद पाटील, तालुकाप्रमुख अनिल पाटील, ॲड. अभय पाटील माजी उपजिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख जे. के. पाटील, शहरप्रमुख अनिल सावंत, शहरप्रमुख ॲड. दीपक पाटील, जिल्हा संघटिका तिलोंत्तमा मौर्य, शहर संघटक दादाभाऊ चौधरी, शहर संघटक दत्ताभाऊ चौधरी, पप्पू राजपूत, भरत खंडेलवाल, युवासेना जिल्हाप्रमुख संदीप जैन, युवासेना तालुकाप्रमुख शशी पाटील, मनोज चौधरी युवासेना शहराध्यक्ष, जयश्री येवले, मंदाकिनी पारोचे, अनिता पाटील, कुंदन पंड्या, आबा देसले, ज्ञानेश्वर पाटील, टी. एस. पाटील, ओम पाटील, रोहन पाटील, भाऊसाहेब पाटील, सुनील महाजन, दीपक पाटील, श्याम पाटील, रतन परदेशी, दीपक पाटील, भाऊसाहेब गोरख पाटील, पप्पू पाटील, धनराज पाटील, देविदास पाटील, भगवान पाटील, अजय पाटील, प्रितेश जैन, ज्ञानेश्वर चौधरी, सुनील पाटील, गणेश पाटील, गोपाल पाटील, प्रेमचंद पाटील, शशी पाटील, संजय रामदास पाटील, रामकृष्ण पाटील, हिलाल पाटील, अरुण तांबे, आनंदा चौधरी, लक्ष्मण पाटील, धनराज पाटील, निर्भय पाटील, प्यारेलाल पवार, नवल चव्हाण, राजू राठोड, तानाजी पाटील, गुरुलाल पवार, समाधान गायकवाड, गुलाब हटकर, हरीश देवरे, पप्पू जाधव बंडू मोरे, फाईम शेख, खंडू सोनवणे, राजेंद्र राणा, संजय चौधरी, गौरव पाटील, धर्मराज पाटील, अरुण सोमवंशी, बाळू मोरे, भूपेश सोमवंशी सह लाखोच्या संख्यांना कार्यकर्ता आणि पदाधिकारी उपस्थित होते.