सत्यजित न्यूजची दखल घेत जरंडी प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली बहुलखेडा गावात झाडाझडती.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०७/२०२३
सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा या गावात मागील काही वर्षांपासून एक बोगस डॉक्टरने कोणताही फलक न लावता आपला दवाखाना थाटून दवाखान्यात बिनधास्तपणे ॲलोपॅथी औषधांचा वापर करुन उपचार करत होता. ही बाब बहुलखेडा या गावातील काही सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सत्यजित न्यूज पाचोरा यांच्याकडे नाव न सांगण्याच्या अटीवर तोंडी तक्रार करुन या बोगस डॉक्टरांची चौकशी करुन आमच्या गावकऱ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सांगितले होते.
याची दखल घेत दिनांक २३ जूलै २०२३ रविवार रोजी सत्यजित न्यूज कडून थेट बहुलखेडा गावात जाऊन दवाखाना असलेल्या पत्र्याच्या शेडची पहाणी केली असता पत्र्याच्या शेडच्या एक दुकानाला कुलुप लावलेले आढळून आले. तेव्हा जवळच बसलेल्या काही मुलांना विचारपूस केली असता या ठिकाणी वरसाडे येथील एक इसम येऊन दवाखाना चालवत असल्याचे सांगितले. ही खात्री पटल्यावर अधिक माहिती जाणून घेतली असता दवाखान्याच्या ठिकाणी कोणताही फलक नव्हता तसेच बारीक फटीतून पाहिले असता त्या ठिकाणी टेबल तीन खुर्ची व दोन पलंग दिसून आले होते.
हे साहित्य दिसून आल्यावर तसेच गावातील लहान, लहान मुलांनी दिलेली माहिती व नाव न सांगण्याच्या अटीवर सुज्ञ नागरिकांनी केलेल्या तक्रारीची शहानिशा करुन सत्यजित न्यूज कडून (बहुलखेडा गावात मुन्नाभाई एम. बी. बी. एस. करतोय रुग्णांच्या जिवाशी खेळ.) या मथळ्याखाली वृत्त देण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत सोयगाव तालुक्यातील जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मा. श्री. श्रीनिवास सोनवणे यांनी तालुका पर्यवेक्षक मा. श्री. एच. एल. दुधे. आरोग्य सेवक मा. श्री. डी. ए. झोंड. यांना सोबत घेऊन थेट बहुलखेडा गावात जाऊन दवाखाना असल्याचे ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन ग्रामस्थांची भेट घेऊन सत्यता पडताळून पाहिली असता यावेळी सत्यजित न्यूज कडून बातमी मध्ये उल्लेख असलेला दवाखाना बंद आढळून आला. असे असले तरी संबंधित बोगस डॉक्टरने सत्यजित न्यूज कडून वृत्त प्रसिद्ध होताच तेथून काढता पाय घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
(बहुलखेडा गावात मुन्नाभाई एम. बी. बी. एस. करतोय रुग्णांच्या जिवाशी खेळ.)
या सत्यजित न्यूज कडून दिलेल्या वृत्ताची दखल घेऊन कार्यतत्परता दाखवत सोयगाव तालुक्यातील जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मा. श्री. श्रीनिवास सोनवणे यांनी बहुलखेडा गावात भेट देऊन बोगस डॉक्टर विषयी सत्यता पडताळून पाहण्यासाठी चौकशी केली व सोयगाव तालुक्यातील कोणत्याही गावात असे बोगस डॉक्टर असल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले.