कर्जबाजारीपणाला कंटाळून कळमसरा येथील बावीस वर्षीय तरुणाची आत्महत्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०४/२०२३
पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील गोपल शिवाजी गटमने वय वर्षे (२२) याने कर्जबाजारीपणाला कंटाळून दिनांक २५ एप्रिल २०२३ मंगळवार रात्री ते दिनांक २६ एप्रिल २०२३ बुधवार सकाळपर्यंतच्या वेळात कळमसरा शिवारातील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे घटना उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गोपाल शिवाजी गटमने हा २२ वर्षीय तरुण वडिलोपार्जित शेत जमीन करुन आपल्या घराचा उदरनिर्वाह चालवत होता. गोपालचे वडील वारले असून त्याला एक बहिण व आई आहे. बहिणाचे लग्न करणे गरजेचे असल्याने पैशाची चिंता तसेच याचवर्षी स्वताचे लग्न केले. याकरिता त्याने शेतावर तसेच काही इतर कर्ज काढले होते. शेतातील शेतमाल आल्यानंतर आपण सर्व कर्ज फेड करु असे स्वप्न रंगवत होता.
परंतु यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे जेमतेम शेतीमाल हातात आला त्यातल्या, त्यात कापसाला व इतर शेतीमालांना योग्य भाव मिळत नसल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत गोपल दिवस काढत होता. अशा कठीण परिस्थितीत नवीनच लग्न झाले असल्याने भविष्याची स्वप्न रंगवत असतांनाच आर्थिक परिस्थिती साथ देत नसल्याने या विवंचनेत त्याने आत्महत्या केल्याची प्रथम माहिती समोर येत आहे.