पाचोरा तालुक्यात बोगस डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीवर चुकीचे उपचार झाल्यामुळे प्रकृती चिंताजनक. भाग. २
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०७/२०२२
पाचोरा तालुक्यासह सगळीकडे खेड्यापाड्यात बोगस डॉक्टरांनी कहर केला असून ते आम्ही एम.बी.बी.एस. असल्याचे भासवण्यासाठी नवनवीन पध्दतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य दवाखान्यात बाळगुन खेड्यापाड्यातील लोकांना भुरळ घालुन वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारा अभ्यासक्रम पूर्ण न करताच वैद्यकीय व्यवसाय करत असल्याने ते सर्वसामान्य व गोरगरिबांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
हे बोगस डॉक्टर खेड्यापाड्यात गरजु रुग्णांच्या अज्ञानाचा व आर्थिक परिस्थीतीचा फायदा घेत दिवसाढवळ्या आपले दवाखाने थाटून बसले आहेत. अश्याच एका खेडेगावातील बोगस डॉक्टरकडून एका खेडेगावातील एका गरजू रुग्णावर दिनांक २४ जूलै रविवार ते २५ जूलै २०२२ सोमवार रात्रीच्या दरम्यान एका बालवयातील मुलीवर उपचार करण्यात आले असून चुकीच्या उपचार पद्धतीमुळे संबंधित मुलीला त्रास जानवल्याने तीला तातडीने एका शहरातील तज्ञ डॉक्टरकडे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूज ला प्राप्त झाले आहे.
म्हणून आतातरी सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर संबंधित विभागाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
(बोगस डॉक्टर या विषयावर सविस्तर वृत्त थोड्याच दिवसांत.)
सुज्ञ नागरिकांनी आपापल्या परिसरातील बोगस डॉक्टर असल्यास सविस्तर माहिती कळवा आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.
आपणही समाजाचं काही देणं लागतो ही जाणीव असू द्या.