वडगाव टेक येथील सहलीला गेलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याचे नाशिक येथे निधन. (घातपात झाल्याची जोरदार चर्चा)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०१/२०२१
दिनांक २८ गुरुवार रोजी जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही गावातून एकमेकांविरुद्ध सरपंचपदासाठीची रस्सीखेच सुरु झाली होती. ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता असावी अशी स्पर्धा सुरु झाल्याने इच्छुकांना सहलीला पाठवून सरपंच निवडीचे दिवशी सदस्यसंख्या आपल्या बाजूने राखून बहूमत मिळवण्यासाठी बऱ्याच ग्रामपंचायत सदस्यांना सहलीवर पाठवण्यात आले होते.
परंतु याच पळवापळवीच्या खेळत
पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथील नवनिर्वाचित सदस्य सहलीसाठी गेले असता एका सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे.
सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच पदासाठी काठावर असलेल्या अनेक गावातील नवनिर्वाचित सदस्य सहलीला गेलेले असुन यातीलच जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग रामदास पाटील यांच्या वडगांव टेक येथील चार सदस्यांना पदमसिंग पाटील यांचे विरोधातील पॅनल प्रमुख सहलीला दमन (वापी) येथे सहलीला घेऊन गेले होते.
नंतर दिनांक २९ रोजी ते नाशिक येथे मुक्कामी आले होते. मात्र अति मद्यसेवनामुळे एका ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाल्याची वर्ता पसरली असुन त्या सदस्याचा अति मद्यसेवनामुळे मृत्यू झाला की घातपात झाला ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
ही घटना घडली कसलीतरी अद्यापही पाचोरा पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकार नोंद करण्यात आली नव्हती.
पाचोरा तालुक्यातील १०० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी दिनांक २८ रोजी आरक्षण जाहीर करण्यात आले. ज्या गावांमध्ये १५ पैकी ८, ९ पैकी ५, १३ पैकी ७, १७ पैकी १० असे सदस्य निवडून आले आहेत. परंतु सत्ता आपल्या हातात यावी म्हणून त्यातील एक किंवा दोन सदस्यांना पैशांचे आमिष दाखवुन आपल्या बाजुला ओढण्यासाठी नगरदेवळा, लोहारा, कुऱ्हाड बु”, कुऱ्हाड खु”, सातगाव (डोंगरी) यासह काही गावातील सदस्यांना पॅनल प्रमुख सहलीला घेऊन गेले आहे. त्यातीलच वडगांव खु” प्र. पा. (टेक) येथे माघारीच्या दिवसा अखेर ४ सदस्य बिनविरोध तर ३ सदस्य निवडणुकीत निवडून आले आहेत. यातील ४ सदस्य जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील यांचे बाजुचे बिनविरोध झाल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी योगेश कुमावत हे त्यांचे सह भिका सोमा भिल, भगवान बाळु पाटील, नाना अवचित पाटील, रमेश शांताराम पाटील यांना दिनांक २८ रोजी दमण (वापी) येथे सहलीला घेऊन गेले होते. दमण हुन ते दिनांक २८ रोजी नाशिकला मुक्कामी आल्यानंतर दिनांख ३० रोजी पहाटे भिका सोमा भिल यास उठविण्यास गेले असता रात्रीतुन त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. भिका भिल याने मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केल्याने त्याचा झोपेतच मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत असलातरी . भिका भिल यांचा मृत्यू मध्ये सेवनाने झाला की घातपात झाला याबाबत तालुका भरातून जोरदार चर्चा सुरू आहे कारण एका बाजूला चार तर एका बाजूला तीन अशी सदस्य संख्या असल्याने बहुमतासाठी निवडून आलेल्या सदस्यांची पळवापळवी करण्यात आली होती. यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली असल्याची चर्चा असून नेमका भीका भिल यांचा मृत्यू कशाने झाला हे डॉक्टरच्या अहवालानंतरच समोर येईल असे समजते.