पाचोऱ्यात रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा सैनिकाच्या पत्नीचा २२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल केला परत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१०/२०२१
पाचोरा येथील मानसिगंका कॉलनीतील तरुण व छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टॉपचे रिक्षा ड्रायावर पपु जाधव यांनी सैनिकांची पत्नी सौ. सोनलताई पाटील या प्रवासी महिलेचा २२ हजार किंमतीचा मोबाईल परत केला आहे.
याबाबत वृत्त असे सैनिकांच्या पत्नी सौ,सोनल पाटील यांच्या मुलांची तबेत खराब होती. त्याला उपचारासाठी देशमुखाडी भागातील लहान मुलांचे सुप्रसिद्ध गजानन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. सौ. सोनलताई पाटील यांनी बाळावर उपचार करुन घरी जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून पप्पू जाधव यांची रिक्षा केली होती.
रिक्षा मधून घरी पोहचल्यावर सौ. सोनलताई घाईगडबडीत रिक्षा चालक पप्पू जाधव यांना रिक्षा भाडे देऊन घरात निघून गेल्या परंतु याच घाईगडबडीत त्या त्यांना मोबाईल रिक्षातच विसरल्या परंतु पप्पू जाधव यांनी नियमीत प्रमाणे भाडे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टॉप वर जाण्यासाठी निघाले. इकडे आपला मोबाईल रिक्षातच राहिल्याचे सोनल पाटील यांच्या लक्षात आले.
म्हणून आपण आपला मोबाईल कुठे विसरलो याची खात्री करुन घेण्यासाठी त्यांनी लगेचच दुसऱ्या फोन वरून त्यांच्या फोनवर फोन लावला असता आपल्या रिक्षात कोणीही नसतांना मोबाईलची रिंगटोन वाजत असल्याचे लक्षात आले. त्यांनी फोन उचलला व सौ. सोनल पाटील यांना सांगितले की तुमचा मोबाईल माझ्या रिक्षात राहिला आहे. मी तुमच्या घरी परत आणून देतो असे सांगत लगेचच रिक्षा परत फिरवून सौ.सोनल पाटील यांच्या घरी जाऊन मोबाईल परत केला.
पाचोरा शहरातील बरेच रिक्षाचालक पाचोरा वासियांच्या व प्रवाशांच्या सुखदुःखात धाऊन येतात अशी बरीचशी उदाहरणे आहेत. व आज अजून पाचोरा शहरातील रिक्षाचालक पप्पू जाधव यांनी याची प्रचिती दिली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.