मुलगी बघायला आले आणि लग्न लावून गेले,मुस्लिम समाजातील पहिला आदर्श विवाह संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील एम.आर.फ्रुट. कंपनीचे हाजी गुलामगोस (बापू) बागवान यांची नात, तथा सादिक गुलामगोस बागवान यांची मुलगी बघायला सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील अमिर खाजा बागवान यांचा मुलगा जमीर उर्फ भैय्या हे दिनांक २६ जानेवारी बुधवार रोजी पिंपळगाव येथे आले होते. दोघ परिवारातील मंडळींना स्थळ पसंत आल्यावर त्यांनी चर्चा सुरु केली याच चर्चेतून चांगले फलीत निघाले.
सद्या कोरानासदृश्य परिस्थिती असल्याने शुभविवाह इतर कार्यक्रमांसाठी गर्दी न जमवणे बंधन कारक असल्याने, आपणही समाजाचे काही देणे लागतो हा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा शुभ मुहूर्त साधत या शुभमुहूर्तावर लग्न लावून विवाह सोहळा पार पाडला, मुस्लिम समाजातील हा पहिला आदर्श विवाह असून सर्वच समाजात असे विवाह व्हावे अस मत शालिग्राम मालकर यांनी वधूवरांना शुभेच्छा देतांना व्यक्त केलं. विवाहप्रसंगी आशीर्वाद देतांना फोटोमध्ये डावीकडून समीर बागवान, शालिग्राम मालकर, वधुपिता सादिक बागवान, नवरदेव भैय्या अमीर बागवान, वरपिता आमिर बागवान, खाजामिया बागवान, आबीद बागवान (सामाजिक कार्यकर्ते) यांचेसह बागवान समाजातील निवडक लोक उपस्थित होते.
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर निवडक लोकांमध्ये झालेल्या ह्या विवाहाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून बागवान परिवाराने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे माजी आमदार मा.श्री. दिलीपभाऊ वाघ यांनी अभिनंदन केले आहे.