मराठा समाजाच्या आरक्षनासाठी गणेश शिंदे यांचा उपोषणाचा इशारा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०८/२०२३
मराठा समजला आरक्षण मिळवून देण्यासाठी पाचोरा येथील मराठा सेवा संघाचे शहर कार्याध्यक्ष व अखिल भारतीय मराठा युवक महासंघाचे तालुकाध्यक्ष मा. श्री. गणेश जनार्दन शिंदे हे १७ ऑगस्ट २०२३ गुरुवार रोजी सकाळी १० वाजता प्रांताधिकारी कार्यलया समोर उपोषण सुरु करणार आहेत.
आपण या देशाचे व समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून मराठा समाजाला ओ. बी. सी. प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मा. श्री. गणेश शिंदे हे उपोषण सुरू बसणार आहेत. या बाबत त्यांनी मा. तहसीलदार व मा. प्रांताधिकारी मा. पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन दिले असून प्रशासनाने यांच्या उपोषणाची दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी करत मराठा सेवा संघ व अखिल भारतीय मराठा महासंघ युवक संघ व सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
या उपोषनाची. प्रशासनाकडून मात्र कुठलीही दखल घेण्यात आली नाही तर २६ ऑगस्ट रोजी २०२३ रोजी शिवसेनेचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे साहेब भाजपचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार हे पाचोऱ्यात येत असून त्याच्या व्यासपीठासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.