पाचोरा येथील जय किरण प्रभाजी पतसंस्थेच्या वतीने दिनांक सहा फेब्रुवारी रोजी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०२/२०२३
जीवनात आपल्याला डोळ्यांचे महत्व जितके प्रकर्षाने लक्षात येते, त्याच प्रकर्षाने अंधांना डोळ्याची गरज आहे, त्यांनाही हे सुंदर जग पाहायचे आहे, तो त्यांचा हक्क आहे, हे लक्षात घेऊन पाचोरा शहरातील जय किरण प्रभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. ॲड. सुभाषचंद्र स्वरुपचंद्र संघवी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षीही स्व. ॲड. सुभाषचंद्र स्वरुपचंद्र संघवी यांच्या १३ व्या स्मृती दिनानिमित्त जय किरण प्रभाजी पतसंस्थेच्या कार्यालयात दिनांक ०६ फेब्रुवारी २०२३ सोमवार रोजी सकाळी ठिक १० वाजेपासून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या तपासणीत ज्यांच्या, ज्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे अश्या व्यक्तीच्या डोळ्याची शस्त्रक्रिया जळगाव येथील नेत्रम हॉस्पिटलचे सुप्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ. विकास बोरोले यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.
या दरवर्षी घेण्यात येणाऱ्या नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात अनेक गरजूंना लाभ मिळाला असून मागील वर्षी याच जय किरण प्रभाजी पतसंस्थेच्या वतीने १५६ गरजू लोकांच्या डोळ्यावर मोफत शस्त्रक्रिया करुन चष्मा वाटप करण्यात आले होते. या पतसंस्थेच्या माध्यमातून मागील बारा वर्षांपासून मोतीबिंदू ऑपरेशन व नेत्र तपासणीचा शिबिराच शेकडो गोरगरीबांना लाभ मिळत आहे.
म्हणून यावर्षीही दिनांक ०६ फेब्रुवारी २०२३ सोमवार रोजी जास्तीत, जास्त गरजूंनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी संस्थेतर्फे केले आहे.