जळगाव जिल्ह्यात रुग्ण हक्काची सनद व माहिती अधिकार कायदा- २००५ चे कलम ४,१ (ख) नुसार दर फलक लावण्यात यावे. श्री.हेमंत गणेश गुरव.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०६/२०२१
जळगाव जिल्ह्यात रुग्ण हक्काची सनद व माहिती अधिकार कायदा- २००५ चे कलम ४,१ (ख) नुसार दर फलक लावण्यात यावे अशी मागणी लोहारा येथील श्री.हेमंत गणेश गुरव यांनी केली जिल्हा प्रशासनाकडे मागणी.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यात शासनाने उपचारासाठी जिल्ह्यात परवानगी दिलेल्या प्रत्येक कोविड खाजगी तसेच शासकीय हॉस्पिटल व सेंटर मध्ये रूग्ण हक्कांची सनद व माहिती अधिकार कायदा-२००५ चे कलम ४,१ (ख) नुसार दर फलक लावावेत अशी मागणी पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंत गणेश गुरव यांनी केली आहे.
भारतीय आरोग्य परिषद यांनी मान्यता दिलेल्या रुग्ण हक्क सनद अनुसार नागरिकांना माहितीसाठी रुग्णालयाच्या दर्शनी भागावर सर्वाना पाहता व वाचता येईल असा माहिती फलक लावणे कायद्याने बंधनकारक आहे असून सध्या कोविड या विश्वव्यापी महामारीने सर्वत्र हा:हाकार माजवला आहे.सदर महामारीवर योग्य नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक खाजगी हॉस्पिटलला,संस्थाना कोविड सेंटर म्हणून मंजुरी/परवानगी दिलेली आहे सदर हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून कोविड उपचाराकरिता मनमानी पध्दतीने पैशांची लूट केली जात आहे.आशा बातम्या बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणावरून रोज वाचनात येत आहे,सर्वसामान्य नागरिकांना कोविड उपचार घेत असताना बेड पासून ते ऑक्सिजन बेड/व्हेंटिलेटर बेड व इंजेक्शन औषधे याच्या दराबद्दल कोणतीही माहिती नसल्याने त्याचा गैरफायदा घेत खाजगी रुग्णालये/संस्था, रुग्णांची आर्थिक लूट करीत असल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणाहुन आपल्या सर्वांना दिसून आले असेलच यामध्ये एक लाखांपासून ते दहा लाखांपर्यंतची बिल वासून करण्याच्या बातम्या देखील आपल्या वाचनात आल्या आहे.
खाजगी रुग्णालयाला प्रशासन कोविड उपचारासाठी परवानगी देते तेव्हा त्या ठिकाणी सर्व शासकीय नियम व कायदे आपोआपच लागू होतात.त्यामुळे माहिती अधिकार कायदा- २००५ चे कलम ४,१ (ख) नुसार खाजगी रुग्णालयामध्ये कोविड संदर्भातील उपचाराकरिता सामान्य बेड पासून ते ऑक्सिजन बेड/व्हेंटिलेटर बेड तसेंच विविध इंजेक्शन व औषधे या बाबतचे सविस्तर दर फलक शिवाय ऐम्ब्युलन्सचे दर फलक आणि बिलाबाबत ऑडीटसाठी प्रशासनाने ऑडीटर यांची नावे व संपर्क क्र. यांचा दरफलक हे हॉस्पिटलने त्यांच्या प्रवेशद्वाराजवळ नागरिकांना सहज दिसेल आशा ठळक अक्षरात लावणे बंधनकारक करावे. व ते दरफलक लावले आहेत का नाही याची खातरजमा करण्याकरिता भरारी पथके नेमावित जेणेकरून गोरगरीब रुग्णाची खाजगी हॉस्पिटलमध्ये चालेली आर्थिक लूट थांबू शकेल. असे पत्र आज हेमंत गणेश गुरव यांनी त्यांचे नावे दिले आहे.