शेतकरी दिनाच्या निमित्तानं, संतोष पाटील.

दिनांक~२३/१२/२०२२
शेतकरी दिनाच्या निमित्तानं
संतोष पाटील
—————————————————————-
शेतकरी मित्रहो २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो, या दिवसाचं अवचित्य साधून देशातील समस्त जनता शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतात शेतकरी बांधव एकमेकांना आजच्या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव करतात.
मात्र एक गोष्ट सतत माझ्या मनाला कुरतडत असते हा शेतकरी दिन आहे की आज खऱ्या अर्थानं शेतकरी दीन झाला आहे.
समस्त शेतकरी मित्रहो या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची नितांत गरज आहे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आज तगायात शेतकरी व शेतीची उपेक्षा झालेली आहे संपूर्ण विश्वातील सर्वात पहिला व्यवसाय म्हणजे शेती, जगातल्या सगळ्या गोष्टी माणसाने निर्माण केलेल्या कारखान्यात तयार करता येतात मात्र जगण्यासाठी जे अन्न खावं लागतं ते निव्वळ शेतकऱ्याच्या शेतीमधूनच येतं, अजून तरी भाकरी बनवणारा कारखाना तयार झालेला नाही.
शेतीच्या माध्यमातून देशातील जनतेचे पोट भरतं त्याच्यानंतर तुमच्या सकल उत्पादनातही
( G D P gross domestic product) शेतीचा मोठा वाटा आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे दुसरी गोष्ट देशातील नव्हे तर जगातील सगळ्याच उद्योगांसाठी,कारखान्यांसाठी लागणारा कच्चामाल शेतीतूनच येतो आणि शेती पिकवणारा शेतकरी उपेक्षित दुर्लक्षित राहतो, आतापर्यंत शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक वेळा चर्चा झाल्या आंदोलन झाले असे किती अधिवेशनं झाले मात्र मार्ग सापडला नाही कारण शेतकऱ्यांचे खरे प्रश्न मांडणारा समजून घेणारा एकही राजकीय नेता नाही, या राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांचे खरे प्रश्न माहीत नसून किंवा माहीत असल्यावर ते मांडण्याची व सोडवण्याची इच्छाच नाही, स्वातंत्र्य मिळायच्या आधी २८४ कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही २५० कायदे जसेच्या तसे ठेवण्यात आले मग खरंच शेतकरी हा स्वातंत्र्य झाला का? म्हणजे अनादी अनंत काळापासून शेतकऱ्यावर होणार अन्याय अत्याचार आजही सुरूच आहे, शेतीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठा व त्यांच्या किमती प्रचंड महाग झाल्या आहेत या सर्व चीजांवर अतिशय जीव घेणे असे कर आकारण्यात येत आहेत, त्या पटीनं शेतकऱ्याच्या पिकांना योग्य मोबदला मिळत नाही, हे शेतकरी विरोधी सरकार आवश्यक वस्तू कायदा (Essential Commodities Act)
चा वापर करून शेतीमालाचे भाव पाडले जातात व शेतकऱ्याचे नुकसान केले जाते, सुरुवातीला सोयाबीन, त्यानंतर कापूस, मका या सर्व शेती पिकांचे पद्धतशीरपणे प्लॅनिंग करून भाव पडण्यात आले, आता कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्यासाठी कापड उद्योग लॉबीने केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे केंद्र सरकारही व्यापाऱ्यांचे हित जोपासणारे असल्याने आज रोजी कापसाचे भाव पडलेले आहेत, दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या अनेक कल्याणकारी योजना पिक विमा ,कर्जमाफी ,विविध प्रक्रिया उद्योग, सबसिडी या सर्व गोष्टी सरकारने भ्रष्टाचारने संपुष्टात आणलेले आहेत, अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या विषयावर बोललं जात नाही त्यांना दुय्यम स्थान दिलं जातं पर्यायाने शेती आणि शेतकरी दिवसान दिवस बिकट परिस्थितीतून जात आहेत, आशा या शेतकऱ्याची अवस्था जीव घेणी आहे खरं म्हणजे शेतकऱ्याला हा शेतकरी दिन साजरा करावा की स्वतःचा मरण दिवस म्हणून साजरा करावा हेच कळत नाही….
संतोष पाटील
७६६६४४७११२