राष्ट्रीय स्तरावरील ई, पोस्टर मेकिंग स्पर्धेत अंबे वडगाव येथील मयूर शिंदे ठरला व्दितीय क्रमांकाचा मानकरी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०४/२०२३
शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या एच. आर. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील ई. पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गुजरातमधील विद्यार्थी दिवेश कोटेचा हा प्रथम क्रमांकाचा तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अंबे वडगाव येथील मयूर शिंदे हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला असून तृतीय क्रमांक वैष्णवी अमृतकर हिने पटकावला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या एच. आर. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील ई. पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील ई-पोस्टर मेकिंग स्पर्धेत १३९ विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेची थीम ही ‘जागतिक आरोग्य दिन वर्तमान जीवनशैलीवर भर ही ठेवण्यात आली होती.
या स्पर्धेत सुमनदीप विद्यापीठ गुजरातमधील विद्यार्थी दिनेश कोटेचा हा प्रथम द्वितीय पारितोषिक गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी जळगाव येथील विद्यार्थी मयूर रामराव शिंदे याला मिळाले. तृतीय पारितोषिक आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी शिरपूर येथील विद्यार्थिनी वैष्णवी संजय अमृतकर हिला मिळाले. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे २००१ रुपये, १००१ रुपये आणि ५०१ रुपये, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व सहभागी विद्यार्थ्यांनादेखील ई-प्रमाणपत्र देण्यात आले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक, मध्य प्रदेश गजरात तसेच आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरीसारख्या दक्षिणेकडील प्रदेशातील विविध संस्थांमधील एकूण १३९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि आपल्या कल्पनांचे प्रदर्शन केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी ई-पोस्टर्स बनवतांना केलेली कामगिरी त्यांच्या स्तरावर सर्वोत्तम कामगिरी होती. स्पर्धेचे आयोजक डॉ. एस. बी. बारी, प्रा. शक्तिपाल पाटील व प्रा. श्रावणी करी हे समन्वयक होते. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी, उद्योगपती चिंतनभाई पटेल, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील. उपस्थित होते.
या यशाबद्दल मयूर शिंदे याचे जिल्हाभरात कौतुक केले जात आहे.