वरखेडी येथून जवळच असलेल्या मानमोडी शिवारात अनोळखी इसमाचा मृत्यू.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०४/२०२३
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या मानमोडी शिवारात एक अनोळखी इसम मृत अवस्थेत पडलेला असल्याची माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला माहीत पडताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना पाठवून शहानिशा केली असता घटनास्थळी फोटोतील अनोळखी इसम मयत अवस्थेत आढळून आला आहे.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक पाटील यांनी त्या अनोळखी इसमास ॲम्बुलन्स मध्ये नेऊन पाचोरा येथील नगरपालिका रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. फोटोतील मयत व्यक्तीच्या बाबतीत कुणालाही काही माहिती किंवा ओळखत असल्यास पिंपळगाव हरेश्वर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.