पिंपळगाव हरेश्र्वर येथील तेली समाज विकास महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०३/२०२२
जागतिक महिला दिनानिमित्त काल दिनांक ०८ मार्च २०२२ मंगळवार रोजी पिंपळगाव हरेश्वर येथील तेली समाज विकास महिला मंडळा तर्फे श्री. समर्थ गोविंद महाराज मंदिरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रमाल पद्मवंशीय तेली समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य कमिटीचे अध्यक्ष दादासो डॉ. श्री. शांतीलालजी तेली यांच्या अध्यक्षतेखाली व सहकोषाध्यक्ष श्री. संजय झेरवाल सर तेली समाज विकास पुरुष मंडळ पिंपळगाव हरेश्वरचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत माहोर, सचिव श्री. अजय नैनाव सर, कार्याध्यक्ष श्री. रघुनाथ ढाकरे, सदस्य श्री. भावलाल ढाकरे, श्री अनिल ढाकरे, श्री. गजानन आगवाल,श्री गोविंद मंडावरे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
यि कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व श्री. माताजी निर्मला देवी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महिला कमिटीने केले. नंतर सहज योग ध्यान केंद्राच्या पाचोरा तालुका महिला अध्यक्षा ठाकूर मॅडम यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले यात आपले आरोग्य कसे चांगले ठेवता येते ते महिलांच्या हातात कसे आहे, या विषयावर त्यांनी सखोल व सुचक मार्गदर्शन केले.
नंतर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पिंपळगाव हरेश्वर तेली समाज महिला कमिटीच्या अध्यक्षा सौ. वंदना झेरवाल, उपाध्यक्ष सौ. तुळसा माहुरे, सचिव सौ. ज्योती नैनाव, सहसचिव सौ. चंद्रकला झेरवाल, कोषाध्यक्ष सौ. शोभा शांतीलाल तेली, युवा अध्यक्ष सौ. पूजा पंचोळे,सहयुवा अध्यक्ष सौ. रेखा ढाकरे, कार्याध्यक्ष सौ. शोभा रमेश नैनाव, सहकार्याध्यक्ष सौ. विद्या नैनाव, सदस्या सौ. संध्या नैनाव, सौ. राधा ढाकरे, सौ. पदमाबाई झेरवाल, सौ. मायाबाई आगवाल, सौ. संध्याबाई नैनाव, सौ. लता झेरवाल, सौ. ललिता तेली, सौ. ज्योती झेरवाल, सौ. शारदा मंगरुळे, सौ. कमलबाई नैनाव यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
यतसेच महिला उपाध्यक्ष सौ. तुळसा माहोर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की सर्व महिलांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे. शिव जयंतीला शिव गर्जना करणाऱ्या सौ. मायाबाई आगवाल यांना त्यांनी पैठणी साडी देऊन त्यांचा सत्कार केला. या नंतर महिला अध्यक्ष सौ. वंदना झेरवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शिव जयंती निमित्त ज्या मुला मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता त्यांचे कौतुक केले. महिला कोषाध्यक्षा सौ. शोभा नैनाव यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्यान मध्ये श्री. चंद्रकांत माहोर यांनी सांगितले की मंगलकार्यालय वास्तू बांधण्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा जमा करता येईल यावर चर्चा आली पाहिजे. श्री. संजय झेरवाल सर यांनी सांगितले की समाज विकास कामे करण्यासाठी आपल्याला महिला पुरुष यांना एकत्र येऊन काम करावे लागेल. या नंतर अध्यक्षीय भाषण डॉ. शांतीलालजी तेली यांनी केले व कार्यक्रमातील ज्या काही खर्चिक गोष्टी आपण आपल्या कार्यामध्ये करतो त्या कुठे तरी हळू हळू बंद करण्यात आल्या पाहिजे असे सांगत महिला मंडळाने अतिशय चांगला कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल त्यांनी महिलांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला सुनील पाटील, ध्यान केंद्र पिंपळगाव हरेश्वर अध्यक्ष श्री. गणेश मालकर, मुरलीधर गिते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संध्या प्रशांत नैनाव , सौ शारदा मंगरुळे व अजय नैनाव सर यांनी केले तसेच आभार सौ पूजा पंचोळे यांनी मानले.