सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे अवैधधंद्याचे विरोधात धाडसत्र सुरुच, महिला वर्गातून समाधान.

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे अवैधधंद्याचे विरोधात धाडसत्र सुरुच, महिला वर्गातून समाधान.

By Satyajeet News
September 4, 2021
319
0
Share:
Post Views: 96
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०९/२०२१

(लोहारा दुरक्षेत्र हद्दीतील कुऱ्हाड येथे गावठी हातभट्टीची निर्मिती व विक्री ही आसपासच्या दहा खेड्यांची डोकेदुखी बनली असून कुऱ्हाड गावपरिसात धाडसत्र राबविण्यात यावे अशी मागणी सुज्ञ नागरिक व महिलांनी केली आहे.)

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये यांनी कायद्याचे सुदर्शन चक्र हाती घेत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गावठी दारु हद्दपार करण्यासाठी कंबर कसली असून दारूचे मटके फोडण्यास सुरुवात केल्यामुळे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील गावागावातून कृष्णा भोये यांचे अभिनंदन होत आहे.

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत मागील दीड वर्षापासून गावागावात मोठ्या प्रमाणात गावठी दारूची निर्मिती व विक्री सुरू होती. यामुळे गावागावात दारुड्यांची संख्या वाढत असल्याने गावात अशांतता पसरली होती. बरेचसे संसार उध्वस्त होत होते तर रोजची भांडणे, कौटुंबिक कलह, अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढत चालली होती हा सगळा प्रकार लक्षात घेऊन गावातील सुज्ञ नागरिक व महिलांनी वारंवार अर्ज फाटे करून सुद्धा दारूबंदी होत नव्हती तसेच नुकत्याच बदलून गेलेल्या सौ.निताजी कायटे यांनी दारूबंदीसाठी प्रयत्न केले होते. परंतु काही ठिकाणी या अवैध दारू विक्री करणाऱ्यांना राजाश्रय मिळत असल्याने पोलिसांचा हेतू साध्य होत नव्हता.

मा.श्री. कृष्णा भोये साहेबांनी आठ दिवसापूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन चे सूत्र हाती घेऊन दोन दिवसापूर्वी कुऱ्हाड येथे ग्रामस्थांशी संपर्क साधून छोटेखानी मिटिंग घेतली व या ठिकाणी गावा गावातील गावठी दारू व देशी दारूची अवैध विक्री थांबवण्यासाठी मी प्रयत्नशील असेल असे सांगून ग्रामस्थांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

त्यानुसार आज मा.श्री. कृष्णा भोये साहेबांनी पोलिस हेड कॉन्स्टेबल मा.श्री. रणजित पाटील, मा.श्री. अरुण पाटील, मा.श्री. धिरज मंडलिक, मा.श्री. रविंद्रसिंग पाटील व योगिता चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेत अवैध दारू निर्मिती व विक्रीच्या विरोधात धाडसत्र सुरु करुन दिनांक ०२ व ०३ सप्टेंबर रोजी शेवाळे शिवारातील सायराबाई रसूल तडवी ह्या त्यांच्या शेतात गावठी दारु गाळत असतांना धाड टाकून गावठी दारु निर्मीतीसाठी लागणारे हजारो रुपयाचे कच्चे रसायन व तयार गावठी दारु नष्ट केली.

तसेच शेवाळे शिवारातील पाझर तलावाजवळ शब्बीर रसूल तडवी हा गावठी दारु गाळण्यासाठी हातभट्टी चालवत असल्याची माहिती मिळाल्यावरुन या ठिकाणी धाड टाकून गावठी दारु निर्मीतीसाठी लागणारे हजारो रुपयाचे कच्चे रसायन व तयार गावठी दारु नष्ट केली.

तसेच दिनांक ०३ सप्टेंबर शुक्रवार रोजी धाड टाकून सुनिल मासूम तडवी गाव शिंदाड व महेमुदा बाई छोटू तडवी यांच्या गावठी दारु निर्मिती अड्ड्यावर धाड टाकून दारु तयार करण्यासाठी लागणारे पक्के रसायन व गावठी हातभट्टीची दारू तयार असा एकूण २४०००/०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.

या कारवाईमुळे सुज्ञ नागरिक व महिलावर्गातून समाधान व्यक्त केले जात असून मा.श्री. कृष्णा भोये यांनी अवैधधंद्याचे विरोधात कडक मोहीम राबवून गावागावातील अवैधधंदे बंद करुन माता, भगिनींचे उध्वस्त होणारे संसार वाचवावेत अशी आपेक्षा व्यक्त केली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुंबई ...

Next Article

प्रा.डी.एम.ललवाणी यांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर येथील २० वर्षीय तरुणीवर अत्याचार प्रकरणी, सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

    February 26, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    मजबुरीचा फायदा घेत लग्न लावून वरपक्षाला लुबाडण्याचा लागला छंद, मात्र पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी या चांडाळ चौकडीला केले जेरबंद.

    May 19, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    बेलापूरचे व्यापारी गौतम हिरणच्या खुन्यांना अटक करण्यासाठी भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे बुधवारी राज्यव्यापी आंदोलन.

    March 9, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    शिंदाड गावातील गावठी दारु सह सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद न झाल्यास शिंदाडच्या महिला धडकणार मंत्रालयावर.

    April 15, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    “शिक्याच तुटल आणि बोक्याच बनल” वादळात पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली हिरव्यागार जिवंत वृक्षांची कत्तल. वनविभागाची अर्थपूर्ण डोळेझाक.

    June 9, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    वाडी येथील कापूस व्यापारी शेतकऱ्यांचा एक कोटी रुपयांचा कापूस घेऊन फरार.

    April 9, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    प्रवासी निवारा पाडल्याने कुऱ्हाड येथील विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय, अपघात होण्याची शक्यता.

  • पाचोरा तालुका.

    स्व. आनंदा बाबुराव मराठे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये व्यापाऱ्यांची मनमानी.

  • क्रिडा क्षेत्र.

    जागतिक कीर्तीची धावपटू मोनिका आथरे पाचोर्‍यात खेळाडूंशी सुसंवाद साधणार.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज