पाचोरा येथील न.पा.दवाखाना व महत्वाच्या कार्यालयासमोर वाहनांच्या रांगा
दिलीप जैन.(पाचोरा)
पाचोरा हे तालुक्याचे शहर असून पाचोरा शहरातील प्रांत कार्यालय , तहसीलदार कार्यालय , पोलीस स्टेशन , नगर पालिकेचे ग्रामीण रुग्णाल , खरेदी विक्री (रजिस्ट्रार ऑफिस) ही कार्यालये छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून थोड्याच अंतरावर आहेत.
वरील कार्यालयाचे कामाची व्याप्ती पाहाता तालुक्यातील खेड्यापाड्यातील गरजू जनता प्रांत , तहसील , पोलीस स्टेशन , खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात.
परंतु बरेचसे लोक आपापल्या चारचाकी , दुचाकीवरून येथे येतात व आपले कामकाज होईपर्यंत आपली वाहने या कार्यालयासमोरील भररस्त्यात उभी करतात या मागचे मुख्य कारण म्हणजे या कार्यालयाजवळ वाहने लावण्यासाठी वाहनतळ नसल्याने कामानिमित्त येणारे लोक आपली वाहने मजबुरीने जागा मिळेल तेथे उभी करता व या महत्त्वाच्या कार्यालयासमोर एकप्रकारे दुचाकी व चारचाकी वाहनांचा बाजारच भरतो
या प्रकारामुळे ग्रामीण रुग्णालयात येणारे अत्यावस्थ रुग्ण व रुग्णांना घेण्यासाठी जाणाऱ्या व घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होतो.तसे पहाता अत्यवस्थ रुग्णांसाठी एक एक क्षण महत्त्वाचा असतो.उपचारासाठी उशिर होतो व यातून नशिबाचा खेळ समजून वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागते रुग्णवाहिकेचे चालक सायरन वाजवतात परंतु कोणीही गंभीरपणे या रुग्णवाहिकांना वाट मोकळी करून देण्यासाठी तसदी घेत नाहीत.
तसेच अपघात झाल्यावर कींवा संवेदनशील विषयावर काही भांडण तंटा किंवा लहानमोठे वाद उदभवल्यावर कायदा , सुव्यवस्था व शांतता स्थापित करण्यासाठी पोलीस अधिकारी व पोलीसांना आपली वाहने तातडीने काढून घटनास्थळी पोहचण्यासाठी अडचणी येतात.तसेच संबंधित कार्यालयात विविध कामानिमित्त येणारे सर्वसामान्य गरजू विशेष करून दिव्यांग , जेष्ठ नागरिक यांना कार्यात जातांना व येतांना सापसीडीचा खेळ खेळल्याशिवाय कार्यालयात किंवा कार्यालयातून येता येत नाही.या वाहनांचा सगळ्यांनाच खुपच त्रास सहन करावा लागतो तरी वाहनतळाची व्यवस्था करुन या कार्यालयांना वाहनांच्या विळख्यातून मुक करावे अशी मागणी पाचोरा शहरातील व तालुक्यातील जनतेकडून केलीजात आहे.
( तसेच पाचोरा शहरात इतर ठिकाणी भररस्त्यात वाहने उभी करून वाहतूककोंडी करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञनागरीकातुन व व्यावसायिक दुकानदारांकडून केली जात आहे )