विद्युत वाहिनीच्या घर्षणामुळे आग, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान. विद्युत वितरण कंपनी कुंभकर्ण झोपेत. भाग २
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०५/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव बुद्रुक येथील शेत शिवारात विद्युत वाहिनीच्या घर्षणामुळे आग लागुन या आगीत शेतकऱ्यांच्या शेतातील गुरांचा चारा, ठिबक संच, ठिबक संचच्या नळ्या, व्हाल्व, प्लॅस्टिक पाईप, दोरखंड, लाकडी वख्खर, कोळपे व शेतीपूरक इतर साहित्य
खुडनीला आलेला मका, दादर तसेच कापून ठेवलेला मका, दादरचे पिक कणसासहीत जळुन खाक झाले असून या आगीत तीन ते चार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अंबे वडगाव बुद्रुक येथील शेतकरी टेकचंद प्रताप राठोड यांच्या शेताच्या बांधावर विद्युत कंपनीचे दोन ट्रान्सफॉर्मर आहेत. तसेच या ट्रान्सफॉर्मर जवळ पत्र्याच्या पेटी मध्ये मोठ, मोठे कट आउट बॉक्स बसवण्यात आले आहेत. या शिवारातून मुख्य विद्युत वाहिनीच्या व इतर विद्युत वाहिन्यांचे जाळे पसरले आहे. या विद्युत तारा (वाहिन्या) एकमेकांच्या खालुन व जवळुन गेल्या असल्याकारणाने थोडेही वादळ किंवा हवा सुटल्यावर ह्या तारा एकमेकांना लागुन शॉटसर्कीट होऊन मोठं, मोठे आगीचे गोळे जमीनीवर पडतात यामागील मुख्य कारण म्हणजे (विद्युत वाहिनीच्या तारा अत्यंत लोंबकळत असून त्या सैल आहेत.) काही ठिकाणी तर या तार जमिनीपासून फक्त आणि फक्त पाच फुटांवर लोंबकळत आहेत.
याबाबत विद्युत वितरणचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे वारंवार अर्जफाटे व तोंडी तक्रारी करुनही संबंधित अधिकारी या समस्येकडे लक्ष देत नाहीत. तसेच अंबे वडगाव सह इतर पाच गावांसाठी नेमणूक करण्यात आलेले (लाईनमन, विद्युत सहाय्यक) हे नियमितपणे मुख्यालयात येत नसल्याने विद्युत ग्राहकांच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणींमुळे विद्युत ग्राहक हैराण झाले आहेत.
याच गलथान कारभारामुळे अंबे वडगाव येथील शेतकरी टेकचंद प्रताप राठोड यांच्या शेतात विद्युत वाहिनीच्या घर्षणामुळे आग लागुन या आगीत टेकचंद राठोड यांच्या शेतातील लाखों रुपये किंमतीचे ठिंबक संच, पाईप, लाकडी वख्खर, कोळपे, दोरखंड, हजारो रुपये किंमतीचा गुराढोरांचा चारा, नुकतेच दादर व मक्याचे कापून ठेवलेले कणसासहीत पिक जळुन खाक झाल्याची घटना घडली आहे.
ही घटना घडल्यानंतर अंबे वडगाव येथील समाजसेवक मा. श्री. अरुण पवार यांनी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची खरडपट्टी केली तेव्हा या विद्युत ताराची दुरुस्ती करण्यात आली आहे. (मात्र या विद्युत तारांची दुरुस्ती करतांना याठिकाणी लाईनमन किंवा विद्युत सहाय्यक असणे गरजेचे होते) तरीही फक्त आणि फक्त हेल्परणे कोणतेही साहित्य उपलब्ध नसतांना आपल्या जीवावर खेळून या विद्युत वाहिनीच्या तारा दुरुस्त केल्या आहेत.
या
महत्वाचे~
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेत शिवारातील व गाव परिसरातील लोंबकळणाऱ्या विद्युत तारांची दुरुस्ती व देखभाल होणे गरजेचे आहे. व आता पंधरा दिवसांनी पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. मात्र अजूनही विद्युत वितरण कंपनीकडून याबाबत कोणतीही दखल घेतली गेली नसून आजही शेत शिवारातील व गाव परिसरातील विद्युत तारा लोंबकळत असून बऱ्याचशा तारा जिर्ण झाल्या असल्याने त्या बदलणं गरजेचे आहे असल्यावर ही विद्युत वितरण कंपनीकडून कोणत्याही हालचाली दिसून येते नाहीत. तसेच पावसाळा सुरु होण्यापूर्वी विद्युत वाहिनीवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे (ट्री कटिंग) करणे गरजेचे आहे परंतु अद्यापही या बाबतीत काहीच हालचाल दिसत नाही. विशेष म्हणजे अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, कोठडी तांड, वडगाव जोगे या पाचही गावांसाठी कायमस्वरूपी नियुक्त करण्यात आलेला लाईनमन व विद्युत सहाय्यक नियमितपणे मुख्यालयात हजार रहात नसल्याने विद्युत ग्राहकांना अनेक अडचणींमुळे जीव धोक्यात घालून विद्युत उपकरणे हाताळावी लागत आहेत.
कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊन बदलीची मागणी~
वरील पाचही गावांसाठी नेमण्यात आलेला विद्युत सहाय्यक अविनाश राठोड याची अंबे वडगाव येथे नियुक्ती झाल्यापासून सतत गैरहजर राहत आहे. याबाबत तक्रारी करुनही या कर्मचाऱ्याची कधीच चौकशी झाली नाही मात्र याच कर्मचाऱ्याला बढती मिळाली व आता लाईनमन म्हणून कार्यरत आहे. या कर्मचाऱ्याचा कार्यकाळ संपल्यानंतर व बढती मिळाल्यावर तसेच याच्या बाबतीत सतत तक्रारी असल्यावर याची बदली होणे गरजेचे आहे.
परंतु या कर्मचाऱ्याची बदली तर होतच नाही व नियमितपणे मुख्यालयात येत नाही. यामागील मोठे गुपीत असल्याचे जनमानसात चर्चेत आहे. या गुपीत विषयाचा लवकरच सत्यजित न्यूज भांडाफोड करणार आहे पुढील बातमीत.
ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं