कविवर्य मा. श्री. प्रभाकर शेळके एक आगळावेगळ व्यक्तीमत्व.

दिनांक~१५/०१/२०२३
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने!
शब्दांचीच शस्त्रे,यत्न करू!!
——————————————–
शेतकरी शेतीनिष्ठ कुटुंबात जन्म घेऊन शिक्षण व साहित्य क्षेत्रात परिवारासोबत गावाचं नाव उज्वल करणारे आमचे मार्गदर्शक श्री. कविवर्य प्रभाकर धनाजी शेळके यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. शेतीमातीशी जोडलेली नाळ आणि साहित्य क्षेत्रात गावकुसातल्या कविता व शेतकरयांची व्यथा मांडून आपण कवितेला उच्च स्थानी घेऊन गेलात. आपले प्रभावी व्यक्तीमहत्त्व सादरीकरण आणि शब्दांची ताकद प्रेषक मनावर प्रभाव करून कविता मनामध्ये रुजते संचारते, सर आपण कविवर्य महानोरांचा आशीर्वाद सतत सोबत बाळगून सोसलेल्या उपभोगलेलं सारं दुःखांचं गाठोड सतत पाटकुळी मिरवून जगत राहिलात आपलं साहित्य क्षेत्रात असलेलं अजमर कार्य आम्हास प्रेरणा देत राहील
शैक्षणिक कार्य-
१) व्याख्याता बहिःशाल शिक्षण केंद्र उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव
२) कथाकथन साने गुरुजी कथामाला
३) ग्रामीण शिक्षण योजना निरंतर शिक्षण केंद्र पुणे, पुणे विद्यापीठ
४) पटकथा लेखन,कृती सत्र बालचित्रवाणी पुणे
५) परीक्षक युवा रंग जळगाव
६) पुस्तक निवड समिती सदस्य महाराष्ट्र राज्य राज्य साक्षरता परिषद शिक्षण संचालनालय पुणे
७) गाणी लोकशिक्षणाची प्रौढ निरंतर शिक्षण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव
८) स्काऊट विभाग अंतर्गत पंतप्रधान ढाल स्पर्धा विजेता दिल्ली येथे सन्मान
———————————————-
साहित्य कार्य
१) निवेदित कवी सहभाग अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
२) प्रमुख सहभाग अहिराणी साहित्य संमेलन
३) सहभाग दलित आदिवासी साहित्य संमेलन
४) सदस्य महाराष्ट्र साहित्य परिषद धुळे
५) आकाशवाणीवर अनेक छोटे मोठे कार्यक्रम
६) महाराष्ट्रातील तमाम नियतकालिके प्रमुख दिवाळी अंक व तसेच अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध तसेच आता साहित्य संमेलनाचे आमंत्रित कवी म्हणून आमंत्रण
सर आपण करत असलेल्या केलेलं कार्य शब्दातीत आहे आपल्या यशाचा आलेख असाच वाढत जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना पुनश्य वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
संतोष पाटील
. ७६६६४४७११२