महिलांमध्ये माती खाण्याच वाढत व्यसन आरोग्यासाठी हानिकारक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०६/२०२२
सद्यस्थितीत लहान मुलांपासून, तरुण पिढी तसेच मध्यमवयीन व जेष्ठ नागरिक व महिलांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्यसन दिसून येते आहे. यात लहान मुले, मुली, तरुण मुले, मुली, मध्यमवयीन तरुण, तरुणी तसेच जेष्ठ नागरिकांमध्ये जेष्ठ व वयस्कर महिला, पुरुष हे मोठ्या संख्येने गुटखा, तंबाखूच्या आहारी गेलेले आढळून येत आहेत. तसेच तरुण मुले व वयस्कर मंडळी विडी, सिगारेट काही प्रमाणात गांजा पितांना दिसून येत आहेत. तसेच अल्पवयीन मुले, मुली व ज्यांच्या हातात शाळा, कॉलेजच्या दप्तराचे ओझे आहे अशी भावी पिढी या सर्व व्यसनांच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेलेली नजरेत पडते आहे.
या वेगवेगळ्या व्यसनाच्या गर्गेत सगळे अडकले जात असतांनाच अजून एक व्यसनाची भर आजच्या सुशिक्षित व सर्वसामान्य कुटुंबातील महिलावर्गात दिसून येते आहे. व ते व्यसन म्हणजे माती खाण्याच खेड्यापाड्यातील तसेच शहरातील बहुसंख्य महिला (मुलतानी माती) खात आहेत. काही वर्षाआधी ही मुलतानी माती औषधोपचारासाठी वापरली जात असल्याने आयुर्वेदिक औषध (जडीबुटी) विकणाऱ्या दुकानातून मिळत असे परंतु आता सगळीकडे महिलांना माती खाण्याची सवय जडल्यापासून मागणी वाढल्याने किराणा दुकान, पान टपरीवर मुलतानी मातीची विक्री होतांना दिसून येत आहे.
माती खाण्याच वाढत व्यसन आरोग्यासाठी हानिकारक~
**********************************
आपण सगळे जण मातीवर प्रेम करतो, मातीतून आपल्याला अन्न मिळतं, मातीपासून वेगवेगळ्या वस्तु तयार करतो, पण मातीतून नशाही येते असं म्हटलं तर ? ते आपणास पटणार नाही परंतु हो, हे खरं आहे. अलीकडे काही महिला, लहान मुलांना, तरुणवर्ग व वृद्धांना माती खाण्याचं व्यसन लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. आज काल नागरिक या मातीचं व्यसन करत असल्याचं
पाहायला मिळालं आहे.
आज काल खाण्यासाठी मातीची मोठ्या प्रमाणात विक्रीही होत आहे. आश्चर्य म्हणजे ही माती कॅल्शियमच चक्क दुकाणात मिळत आहे. वैद्यकीय दृष्ट्या माती अधिक व दीर्घकाळ सेवनाचे दुष्परिणाम सांगितले आहेत. मातीमध्ये कॅल्शियमची मात्रा अधिक म्हणजे २१.२५ टक्के आहे. सामान्यतः मानवी शरीरात कॅल्शियमचं प्रमाण ०८.०५ ते १०.०२ मायक्रो ग्रॅम / पार्ट असते. ही माती प्रमाणापेक्षा अधिक सेवनाने व दीर्घकाळ सेवनाने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात.
अर्थात माती सेवन करणाऱ्यांच्या शरीरातील प्रमाण प्रचंड वाढल्याने त्याचा किडनीवर दुष्परिणाम होऊन किडनीची कार्यक्षमता कमी होते. शिवाय तहान खूप लागते व परत, परत लघवीला जावं लागतं. तसेच भुकेवर परिणाम होऊन पचनसंस्था बिघडते. अधिक कॅल्शियममुळे शरीरातील हाडांवर देखील परिणाम होऊ शकतो. कॅल्शियमचं प्रमाण वाढल्याने मेंदूवर परिणाम होऊन अनेकदा चक्कर येणे, थकवा जाणवणे, डिप्रेशन येणे तसेच हृदयावर परिणाम होऊन हृदयगती कमी जास्त होणे, हृदय गतीवरील नियंत्रण सुटणे असे धोकादायक प्रकार होऊ शकतात. एकंदरीतच कॅल्शियम अतिप्रमाणात सेवन करणे शरीराला हानिकारक ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन आता महिलांशी संवाद साधून मतपरिवर्तन करणे गरजेचे आहे. तसेच खेड्यापाड्यात व ठिकठिकाणी मुलतानी मातीची होणारी विक्री थांबवणे गरजेचे झाले आहे.
(पाचोरा तालुक्यातील अंदाजे साडेपाच हजार लोकवस्तीच्या एका गावात दोन किराणा दुकानातून दरमहा एक ते दिड क्विंटल मुलतानी मातीची विक्री होत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे.)