पाचोरा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा, डॉ. अंकुर झंवर “द अचीव्हर्स अवॉर्ड २०२२” ने सन्मानित.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/११/२०२२
पाचोरा शहरातील प्राईम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील ह्रदयरोग विषेतज्ञ डॉ. अंकुर अनिल झवर यांना “द अचीव्हर्स अवॉर्ड २०२२” चा पुरस्कार देऊन सिंगापूर येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान म्हणजे पाचोरा शहर व तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रासाठी मानाचा तुराच म्हणावे लागेल.
कारण डॉ. अंकुर यांनी आतापर्यंत “इंटर्वेंशनल कार्डियोलॉजी” या विषयात केलेली भरीव कामगिरी व दिलेल्या योगदानामुळे हा मानाचा असा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांनी एवढ्या कमी वयात (१००००) पेक्षा जास्त कार्डियाक अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी यशस्वी रित्या करण्याचा जणू एक नवा किर्तीमानच स्थापित केला आहे. या सोबतच भारतातील सर्वात तरुण ५० हृदयरोग विशेषज्ञ यामध्ये देखील त्यांनी आपले नाव दाखल केले आहे, त्यासाठी त्यांचे जळगाव जिल्ह्यासह, पाचोरा, भडगाव व जामनेर या तालुक्यातून व पंचक्रोशीतील गावागावातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.