श्रीकृष्ण विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०६/२०२२
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील डॉ. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे . विद्यालयाचा एकुण निकाल १००% लागला आहे.
विषेश प्राविण्यासह एकुण ९८ विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले. यात गुणवंत विद्यार्थीनीं लोचना श्रीकृष्ण चौधरी हिने (९४.६०) टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, मनाली भागवत पाटील हिने (९४.४०) टक्के गुण मिळवून व्दितीय तर श्रध्दा महेश कुलकर्णी हिने (९३.८०) टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
तसेच इतर गुणवंत विद्यार्थी मनस्वी निलेश पाटील (९३.४०), सिमरण नवलसिंग नाईक (९२.८०), अनिकेत सुनिल कळवत्रे (९२.४०), भावेश रामकृष्ण भिवसणे (९२.४०), दृष्टी प्रकाश वानखेडे (९२.२०), प्रतिक्षा धर्मेंद्र रोकडे (९२.००), तन्वी दिलिप पाटील(९१.८०), अमेय प्रदिप गुजर (९१.६०) निखिल सुनिल माळी (९१.६०), पल्लवी संजय बारी (९१.६०) टक्के गुण मिळवून आपले व संस्थेचे नावलौकिक केले आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. कौमुदी साने, उपाध्यक्ष, सचिव कांतीलाल ललवाणी, संचालक डॉ.हकल्पक साने तसेच सर्व संचालक मंडळ. प्राचार्या शिलाबाई पाटील, राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले आहे.