नापिकीमुळे वाढलेला कर्जाचा बोजा सहन न झाल्याने परिस्थितीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/११/२०२२

सततच्या नापिकीमुळे वाढलेला कर्जाचा बोजा सहन न झाल्याने एका शेतकऱ्याने परिस्थितीला कंटाळून कोणतेतरी विषारी द्रव्य सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ शनिवार रोजी जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे घडली असून या घटनेबाबत शेंदुर्णी शहरासह पंचक्रोशीतील गावागावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज नगरर येथील रहिवासी ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड वय वर्षे ४८ यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेतजमिनी आहे. ते वयोवृद्ध आई, वडील, पत्नी, दोन मुले यांच्यासोबत एकत्र कुटुंबात रहात होते. तसेच त्यांना एक मुलगी असून तीचे लग्न झाले आहे. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेत जमीन होती. या जमीनीवर ते परिवारासह रात्रंदिवस मेहनत करत होते. परंतु कोरडवाहू जमीन असल्याने सर्वकाही निसर्गाच्या स्वाधीन असल्याने मागील काही वर्षांपासून निर्सगाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ तरीही निर्सगाच्या लहरीपणाचा सामना करुन ते शेतात जास्तीत जास्त उत्पादन कसे काढता येईल याकरिता प्रयत्नशील होते.

परंतु घरात वृध्द आई, वडील व परिवार असल्याने कधी दवाखान्याचा खर्च व दैनंदिन खर्च व दैनंदिन खर्च व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतात खर्चापेक्षा कमी येणारे उत्पन्न व शेतीमालाच्या भावातील चढ, उतार यामुळे ज्ञानेश्वर गायकवाड यांचे आर्थिक गणित जुळत नसल्याने गरजेपोटी घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढतच गेला तसेच यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी हतबल होऊन दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ शुक्रवार आत्महत्या करण्यासाठी शेतात जाऊन कोणतेतरी विषारी द्रव्य घेतले ही बाब लक्षात येताच त्यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ शनिवार रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ही वार्ता शेंदुर्णी गावात माहीत पडताच शेंदुर्णी शहरासह पंचक्रोशीतील गावातून हळहळ व्यक्त केली जात असून मयत ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यावर बॅंकेचे किंवा इतर शासकीय कर्ज असल्यास ते माफ करुन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई व शासकीय मदत मिळावी अशी मागणी जनमानसांतून केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या