अवैध धंदे करणारांची गय केली जाणार नाही, पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे. शिंदाड, गहुले शिवारातील गावठी दारुच्या हातभट्ट्या उध्दवस्त.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/११/२०२२

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे हद्दीतील शिंदाड व गहुले शिवारत मोठ्या प्रमाणात गावठी दारु निर्मीती व विक्री होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे साहेब यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ शनिवार रोजी सकाळी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत शिंदाड व गहुले शिवारातील हातभट्टीवर धाड टाकून हजारो रुपयांची तयार गावठी दारु व कच्चे रसायन नष्ट केल्याने गावठी दारु निर्मिती व विक्री करणारांचे धाबे दणाणले असून या धडक कारवाई बाबत पंचक्रोशीतील गावातून सुज्ञ नागरिक व महिला वर्गाने पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांचे अभिनंदन केले व अशीच कारवाई सतत करुन कायमस्वरूपी गावठी दारु निर्मिती व विक्री बंद करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

या कारवाईत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या शिंदाड व गहुले शिवारातील गावठी हातभट्टी दारू बनविणाऱ्या एकुण चार गावठी दारुच्या भट्टीवर छापे मारून तयार गावठी दारु व कच्चे रसायन नष्ट करत रमजान तडवी, हैदर सिकंदर तडवी, सचिन तडवी, बुधा तडवी यांच्या विरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईत १७०० लिटर हातभट्टीची दारु व इतर कच्चे रसायन, प्लॅस्टिक टाक्या व इतर उपयोगी साहित्य जागेवर जप्त करुन नाश करण्यात आले. मागील काही वर्षांपासून ही सर्वात मोठी कारवाई झाली असल्याने अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले असून या कारवाईबाबत पिंपळगाव हरेश्र्वर, शिंदाड, पिंप्री, राजुरी, वरखेडी व पंचक्रोशीतील गावातून सुज्ञ नागरिकांनी व त्रस्त महिलांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांचे आभार मानले असून कारवाईत असेच सातत्य ठेऊन शिंदाड येथील गावठी दारु निर्मिती व विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे. कारण शिंदाड येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करुन जवळपासच्या आठ ते दहा खेड्यापाड्यात या दारुची विक्री केली जात असल्याने शिंदाड येथील दारु निर्मिती व विक्री ही सगळीकडे डोकेदुखी ठरत आहेत.

या कारवाईत पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. महेंद्र वाघमारे साहेब हवालदार रणजित पाटील, संदीप राजपूत, अरुण राजपूत, पंकज सोनवणे व इतर पोलीस कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.

ब्रेकिंग बातम्या