पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.श्री.कृष्णा भोये यांचे नागरीकांना अवाहन
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/११/२०२१
पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये साहेब यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील नागरीकांना सर्वधर्मसमभाव व जातीय सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.
कारण सध्या शोसलमिडियावर जातीधर्मात द्वेष निर्माण होतील, अशा पोस्ट व्हायरल होत असुन अशा पोष्ट व्हायरल करणे हे काही समाजकंटकाचे षडयंत्र असून अश्या पोस्टवर कुणीही विश्वास ठेवु नये. तसेच सामाजिक सलोखा राखून सहकार्य करावे.
तसेच जातीधर्मात व्देष निर्माण होतील अश्या पोस्ट बनवून टाकणे किंवा व्हायरल होणाऱ्या पोस्ट इतर माध्यमातून पुन्हा व्हायरल करणे किंवा कोणत्याही समाजविघातक कृत्यात सहभागी झाल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा व सुचना दिल्या असून,
*पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वधर्मीय सुजाण नागरिकांनी वरील सूचनांचे तंतोतंत पालन करून आपला स्नेह पोलिसांप्रती व जनतेप्रती कायम राखावा* *आपला सर्वधर्मसमभाव व सलोख्याचा आदर्श ही इतरांसाठी एक प्रेरणा ठरावी यासाठी प्रत्येकाने मनापासून प्रयत्न करावे* *महाराष्ट्र पोलीस २४ तास सतर्कतेने आपले कर्तव्य करत आहेत* असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील नागरीकांना केले आहे.