ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान. पहान येथील अकील, शकील मागील तीन वर्षांपासून करत आहेत मोफत रुग्णसेवा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०४/२०२२
(अकील व शकील यांचा न्यूज झेप इंडिया व सत्यजित न्यूजतर्फे लवकरच सत्कार करण्यात येणार आहे.)
पाचोरा तालुक्यातील पहान हे छोटेसे गाव आहे. या गावात दिलीप पटेल व त्यांची धर्मपत्नी बेबाबाई पटेल हे अल्पभूधारक शेतकरी रहातात. हे कुटुंब थोडीशी शेती व मोलमजुरी करून आपला संसाराचा गाडा ओढतात. यांच्या या छोट्याशा संसाराच्या वेलीवर अकील व शकील ही दोन पुष्प (मुले) ही दोघेही मुले हालाखीची परिस्थिती असल्याने परिस्थितीनुसार बारावी पर्यंतचे शिक्षण घेऊन मोलमजुरी करून आपल्या आईवडिलांना मदत करतात.
असेच मोलमजुरी करून दिवस निघत होते असेच तिन वर्षांपूर्वी एक दिवस दिलीप पटेल हे दैनंदिन कामकाज करत असतांनाच त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली. पायावर त्वरित उपचार करणे गरजेचे होते म्हणून बेबाबाई व अकील, शकील यांनी गावात जाऊन दवाखान्यात जाण्यासाठी मोटारसायकल किंवा इतर वाहनांची शोधाशोध केली मात्र गावातून प्रतिसाद मिळाला नाही. एकाबाजूला वडीलांना दवाखान्यात नेणे गरजेचे असतांना गावात वाहन नसल्याने अकील व शकील निराश झाले होते.
तरीही त्यांनी त्या कठीण परिस्थितीत धीर न सोडता मोठ्या हिमतीने वडीलांना औषधोपचारासाठी दवाखान्यात नेऊन वेळीच उपचार केले. म्हणून पुढील अनर्थ टळला होता. हा बाका प्रसंग अकील व शकीलच्या मनात घर करुन बसला होता. पहान हे गाव शहरापासून लांब आहे. गावातील रहिवासी शेतकरीवर्ग असल्याने प्रत्येकाला स्वयंचलित वाहन बाळगणे शक्य नसल्याने गावावर काही कठीण प्रसंग ओढवला तर एकच पळापळ व्हायची व कठिण प्रसंग ओढवल्यावर त्या कुटुंबातील सदस्यांची काय घालमेल होते याची जाणीव अकील व शकील यांच्यावर आलेल्या संकटांतून त्यांना चटका देऊन गेली होती. म्हणून भविष्यात असा कठीण प्रसंग ओढवल्यावर जर का वेळेवर उपचार नाही मिळाले तर एखाद्याच्या जीवावर बेतू शकते म्हणून अकील व शकील बेचैन झाले होते.
याच विचारात असतांनाच अकील व शकील या दोघांनी गावातील लोकांच्या सेवेसाठी म्हणजेच अत्यावश्यक व कठिण प्रसंगी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो अश्या सेवाभावी वृत्तीने रुग्णांसाठी मोफत वाहनाची व्यवस्था करण्यासाठी जुने का होईना एक चारचाकी वाहन घेण्याचे ठरवून हात उसनवारी करून पैसे जमा करुन काही दिवस वापरलेली चांगल्या परिस्थितीत असलेली जुनी क्रुझर गाडी विकत घेऊन गावातील पिडीत, आजारी लोकांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी दवाखान्यात नेणे परत आणणे अशी स्वखर्चातून रुग्णसेवा सुरु केली गावात जाहीर निवेदन (दवंडी) देऊन कुणालाही वैद्यकीय उपचारासाठी गरज भासल्यास आम्हाला कळवा आम्ही मोफत सेवा देऊ असे जाहीर केले होते. व त्यानूसार ते मागील तीन वर्षांपासून पहान ग्रामस्थांची उन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता अविरतपणे अहोरात्र मोफत रुग्णसेवा करत आहेत.
याच कालावधीत मागील वर्षी सगळीकडे कोरोना सारख्या भयंकर संसर्गजन्य आजाराने जगभरात थैमान घातले होते. या कठीण परिस्थितीत स्वार्थी, मतलबी जगात रक्ताच्या नात्यातील लोकांनी आपापला जीव वाचवण्यासाठी आपल्याच नात्यातील भाऊ, बहीण एवढेच काय जन्मदात्या आई, वडीलांना वाऱ्यावर सोडून पळ काढला होता. अशा कठीण कोरोनासारख्या महामारीच्या काळातही अकील व शकील यांनी स्वताच्या जीवावर उदार होऊन अहोरात्र रुग्णसेवा केली होती हे विसरुन चालणार नाही.
अशा या अकील व शकीलच्या मोफत रुग्णसेवेला नुकतेच तीन वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांच्या या कार्याबद्दल पहान गावातून तसेच सुज्ञ नागरिकांनी त्यांचें कौतुक करत आभार मानले आहेत. असे असले तरी आजपर्यंत या अकील व शकीलच्या या कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता रुग्णांसाठी सेवा देत असल्याची दखल आजपर्यंत कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी घेतली नाही ही मोठी खेदाची बाब आहे.
बेबाबाई पटेल~
अकील व शकीलच्या मोफत रुग्णसेवेची माहिती सत्यजित न्यूजला माहीत झाल्यावर आम्ही अकील, शकील व त्यांच्या आई बेबाबाई पटेल यांची पहान येथे जाऊन भेट घेतली असता बेबाबाईंनी सांगितले की अकील और शकील मेरे चॉंद और सुरज जैसे दो बेटे हैं. माणूस जन्माला येतो परंतु तो माणूस म्हणून जगला व वागला पाहिजे दोन हात, दोन पाय, डोके घेऊन जन्माला येणाऱ्या सजीवाला मानव म्हणून ओळखले जाते. परंतु आपण या पृथ्वीवर एक शाकाहारी व बुध्दीजीवी आहोत याचे भान आपण ठेवले पाहिजे. असे सांगत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे असे मनोगत व्यक्त करतांना त्या मध्येच हिंदी भाषेत बोलू लागल्या पुढे त्या म्हणाल्या की मुठ्ठी बांधकर आये है, हात पसारे जाना हैं जिंदगी है तब तक प्यार, मोहब्बत, भाईचारा बाटते रहो ये तो अल्लाह, भगवनकी देन हैं ये ना काही खरीदी जा सखती हैं, ना ये बाटनेसे कम होती हैं, जितना बाटोगे उससे दुगना मिलती है. मेरे बेटे मेरे जरुर हैं लेकिन इनकी एक और मॉ भी हैं और वो मॉ हैं मेरी, तुम्हारी, सबकी भारत मॉ असे सांगताना बेबाबाई भावूक झाल्या होत्या माझी मुल जनतेसाठी काहीतरी करत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे असे त्या सांगतात.
आजच्या चाललेल्या वातावरणाबद्दल त्यांना प्रश्न केला असता त्यांनी समर्पक उत्तर दिले त्या म्हणाल्या (ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान.) असे सांगत आपल्या उदार मनाचा दाखला दिला.