शेंदुर्णीत भाजपाच्या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०८/२०२१
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक गणेश किसन पाटील यांच्या विरोधात पहूर पोलिस स्टेशनला फिर्यादी महिलेने विनयभंगाची तक्रार दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेंदुर्णी येथील शेतकरी महिला त्याच्या मालखेडा शिवारातील शेतात उडदाच्या शेंगा तोडणी करण्यासाठी पतीसोबत शेतात गेली होती परंतु सदर महिलेचे पती घरगुती कामासाठी गावात निघून गेल्यानंतर महिला एकटीच शेतात होती. गणेश पाटील हे पाणी पिण्यासाठी माठा जवळ आले मी त्यांना माठातून पिण्यासाठी पाणी दिले ,तद्नंतर शेंगा तोडणीस निघत असतांनाच गणेश पाटील यांनी माझा हात धरला व लज्जा वाटेल अश्या नजरेने पाहून येथे बस म्हणू लागला, मी त्याच्या हाताला झटका देऊन तेथून निघून गेली,दुपारी पती व सासू शेतात आल्यावर घडलेला प्रकार त्यांना सांगितला तद्नंतर पतीने गणेश पाटील याला फोन करून विचारले तर नंतर बोलतो असे सांगून टाळले,असे फिर्यादीत म्हटले आहे,सदरची फिर्याद नोंद झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेच्या पतीने गणेश पाटील यांच्याशी सायंकाळपर्यंत संपर्क साधून असे का केले म्हणून विचारले, पोलिस चौकीत फिर्याद देण्यासाठी गेले असता अनेकांनी गणेश पाटील यांना बोलाउन त्यांना माफी मागण्याची सांगितले,
नगराध्यक्षपती अमृत बापू व अनेक नगरसेवकांनी त्यांना माफी मागून प्रकरण मिटवून घ्या असे सांगितले,असे फिर्यादी महिलेच्या पतीने सांगितले.
पोलीस चौकीवर फिर्याद देण्यासाठी गेलेल्या महिलेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, चौकीवर मनुष्यबळ कमी असल्याने फिर्याद घेण्यासाठी अनेक तास थांबावे लागले व तद्नंतर सामाजिक दबाव वाढल्याने पहूर पोलिस स्टेशनमध्ये पाठवण्यात आले.
सदर महिलेने एक महिन्याच्या मुलीसह पडत्या पावसात मोटर सायकलने पतीसह पोलीस स्टेशन गाठले. तेथे तक्रार देऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चौकट
फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर नगरसेवक गणेश पाटील यांच्या पत्नीने फिर्यादी महिलेच्या पतीविरोधात विनयभंगाची तशीच तक्रार दिली आहे ,
सदर क्रॉसकंप्लेंट नोंदवून घेतलेने शेंदुर्णीत पोलिसांच्या विरोधात सूर उमटत आहे.
कारण सुरवातीला शेंदुर्णी पोलिस चौकीवर पिडीत महिलेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले तसेच फिर्याद देण्यासाठी बराचवेळ थांबावे लागले बराचवेळ थांबूनही मनुष्यबळ कमी असल्याचे कारण पुढे करत सदर महिलेला तक्रार दाखल करण्यासाठी भर पावसात पहूर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद द्यावी